आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेव्ह एगर्सची ‘द सर्कल’ सोशल मीडियाचे उलगडतो पदर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमच्या काळात 1984 सारखी कादंबरी लिहिली जाऊ शकत नाही. मात्र, डेव्ह एगर्स यांची नवी कादंबरी द सर्कल त्या कादंबरीचा प्रभावशाली आणि समकालीन विस्तार आहे. द सर्कलचा सार असा आहे की, बिग ब्रदर अधिक मजेदार आणि अधिक घातक अवतारात अजूनही आपला पाठलाग करत आहे. सर्कल एक काल्पनिक कॉर्पोरेशन आहे. हा पूर्णपणे गुगलशी मिळताजुळता आहे. कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना भरपूर पैसे देते. त्यांना मोफत कपडे, जेवण आणि आरोग्य सुविधा पुरवली जाते. एक युवती आपल्या नोकरीच्या पहिल्या दिवशी तिथे पोहोचल्यावर रोमांचित होते. सर्कलचे सदस्य माहितीच्या आधारावर पारदर्शकतेच्या माध्यमातून जगाला एक चांगले ठिकाण बनवू इच्छितात.
सर्कल नोकरीपेक्षा एक समूह आहे. ज्यातून सामाजिक भागीदारी अपेक्षित आहे. तो काही पोस्ट, कॉमेंट किंवा ट्विट करत नसेल, तर त्याची खरडपट्टी काढली जाते. लवकरच सोशल मीडियाच्या विळख्यात अडकते. ती रात्र रात्रभर ई-मेल, ट्विट आणि पोस्ट करण्यात मग्न असते. यादरम्यान, सर्कलचा विस्तार होत असतो. त्याभोवती माहितीचे जाळे तयार होते. ते जगभरात स्वस्त हाय डेफिनेशन कॅमेर्‍यांचे जाळे पसरवतो. त्याद्वारे नेटवर सतत व्हिडिओ पाठवले जातात.