आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत ‘बूटबॉम्ब’चा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- बुटामध्ये दडवून ठेवल्या जाणार्‍या स्फोटकाबाबत अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा विभागाने विविध विमान कंपन्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. विमानांच्या सुरक्षेबाबत देशांतर्गत व विदेशी विमान कंपन्यांना माहितीची देवाण-घेवाण केली जाते. मात्र, एअरलाइन्सना पाठवलेल्या इशार्‍याची माहिती देण्यास अंतर्गत सुरक्षा विभागाने नकार दिला आहे.
तत्पूर्वी रशियाला जाणार्‍या विमानांमध्ये टूथपेस्टसारख्या वस्तूंमध्ये स्फोटके ठेवल्या जाण्याचा इशारा या महिन्याच्या सुरुवातीस देण्यात आला होता. यानंतर वाहतूक सुरक्षा विभागाने रशियाला जाणार्‍या प्रवाशांना द्रवरूप पदार्थ घेऊन जाण्यावर बंदी घातली होती.