आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boston Bomb Blast Victims Tells Story Of The Blast Scene

रक्ताचा सडा आणि तुटलेले अवयव, मॅरेथॉनच्‍या फिनीश लाईनवर सर्वच झाले \'फिनीश\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोस्‍टन- दहशतवाद्यांनी अमेरिकेतील बोस्‍टन मॅराथॉनला लक्ष्‍य केले. मॅरेथॉनच्‍या अखेरच्‍या टप्‍प्‍यात भीषण स्‍फोट झाले. स्‍फोटांची तीव्रता होती की क्षणातच अनेक धावपटुंना पाय गमवावे लागले. जिथे आनंदाचा जल्‍लोष साजरा करण्‍यात येणार होता, तिथे काही क्षणांमध्‍येच शोकाकूल वातावरण निर्माण झाले. घटनास्‍थळी उपस्थित असलेल्‍या काही जणांनी पहिलेल्‍या या भीषण दृष्‍याला शब्‍दांमध्‍ये वाचा फोडली.

बोस्‍टन मॅराथॉन 26.2 मैलांची असते. मॅरेथानच्‍या फिनीश लाईनच्‍या अवघ्‍या 100 फुटांवरच दोन स्‍फोट झाले. काय झाले हे कळायच्‍या आतच तिथे गोंधळ उडाला. अनेक धावपटू सैरावैरा पळू लागले. रुपेन बेस्‍टाजाईन हा 35 वर्षे वयाचा सैनिकही मॅरेथॉनमध्‍ये सहभागी झाला होता. त्‍याने सांगितले की, काही जण मॅरेथॉन पूर्ण करणारच होते तेवढ्यात स्‍फोट झाले आणि त्‍यांना पाय गमवावे लागले. अनेक ठिकाणी रक्ताचा सडा पडला होता. निर्जिव अवयव, अस्थि आणि मासांचे तुकडे विखुरलेले होते.

ड्रिडे हेटफील्‍ड या 27 वर्षीय महिला धावपटूने सांगितले की, फिनीनश लाईनला स्‍पर्ष करणार, तेवढ्यात स्‍फोट झाले. स्‍फोटाच्‍या आवाजामुळे मी काही क्षण बधीर झाले. रस्‍त्‍यांवर अनेक जण उडाले होते. माझ्याजवळ दोन लहान मुलांचे मृतदेह पडले होते. अनेक जणांचे पाय गेले होते. मी जवळच्‍याच स्‍टारबक्‍स कॉफी शॉपमध्‍ये आश्रय घेतला. जवळपास 100 जण तिथे उभे होते. त्‍यानंतर मी माझा बॉयफ्रेंड आणि कुटुंबिय थांबलेल्‍या हॉटेलकडे धावले. कदाचित तिथेही स्‍फोट झाला असावा, असे मला वाटले.