आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boston Bombs Made From Pressure Cookers, Shrapnel

बोस्‍टन स्‍फोटांमध्‍ये वापरण्‍यात आले 'प्रेशर कुकर बॉम्‍ब'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोस्‍टन- बोस्‍टन शहरात सोमवारी मॅरेथॉनदरम्‍यान झालेल्‍या बॉम्‍बस्‍फोटांप्रकरणी तपास यंत्रणा अद्याप अंधारातच आहेत. हा स्‍फोट कोणी आणि का घडविला, याबाबत कोणत्‍याही निष्‍कर्षापर्यंत तपास पथके पोहोचली नाहीत. परंतु, स्‍फोटांसाठी प्रेशर कुकरचा वापर करण्‍यात आल्‍याचे स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

बोस्‍टन मॅरेथॉनदरम्‍यान झालेल्‍या बॉम्‍बस्‍फोटात 3 जण ठार तर 170 पेक्षा जास्‍त जण जखमी झाले. याप्रकरणी तपास यंत्रणांनी घटनास्‍थळावरुन अनेक नमुने गोळा केले. त्‍यावरुन काही निष्‍कर्ष काढण्‍यात आले आहेत. स्‍फोटांसाठी 6 लिटरच्‍या प्रेशर कुकरचा वापर करुन 'आयईडी' तयार करण्‍यात आले. स्‍फोट घडविण्‍यासाठी टायमरचा वापर करण्‍यात आला. घटनास्‍थळी काही सर्किटचे तुकडे सापडले आहेत. त्‍यावरुन रिमोट कंट्रोलचा वापर करण्‍यात आल्‍याची शक्‍यता फेटाळण्‍यात आली. अशाप्रकारचे प्रेशर कुकर बॉम्‍ब अफगाणिस्‍तान, पाकिस्‍तान किंवा भारतात वापरण्‍यात येतात. तसेच एकट्याच दहशतवाद्यांने हे स्‍फोट घडविल्‍याचा संशय आहे. त्‍यानेच बॉम्‍ब तयार केले आणि मोठ्या पिशवीमध्‍ये ते ठेवले, असे तपास यंत्रणांचा म्‍हणणे आहे. जास्‍तीत जास्‍त लोकांना दुखापती व्‍हाव्‍या, यासाठी बॉम्‍बमध्‍ये खिळे तसेच बॉल बेअरींचाही वापर करण्‍यात आला होता.

भारत, अफगाणिस्‍तान आणि पाकिस्‍तानसारख्‍या देशांमध्‍ये प्रेशर कुकर सहजपणे उपलब्‍ध होतात. त्‍यामुळे दहशतवादी या पद्धतीचा वापर करतात. अमेरिकेमध्‍ये तशी उपलब्‍धता नसल्‍याचे एफबीआयच्‍या अधिका-याने सांगितले.