आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boston Marathon Explosions: Second Blast Seen From The Street

BLAST: बोस्‍टनच्‍या दोषींना शिक्षा देऊ- ओबामा, जगभरातून स्‍फोटाचा निषेध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोस्टन- अमेरिकेतील बोस्टनमध्ये सोमवारी झालेल्या मॅराथॉनमध्ये तीन बॉम्बस्फोट झाले. त्यानंतर अर्ध्या तासाने जेएफके लायब्ररीत तिसरा स्फोट झाला. दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच 132 पेक्षा जास्‍त जखमी झाले आहेत. तथापि, अमेरिकेतील काही वेबसाइटनुसार किमान 12 जण ठार झाले असून, 150 हून अधिक जखमी आहेत. (पाहा, पहिल्यास्फोटाचा VIDEO) यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. अमेरिकेचे राष्‍ट्रपती बराक ओबामा यांनी बोस्‍टनच्‍या दोषींना हुडकून काढून आणि शिक्षा देऊ असे म्‍हटले आहे. तर एफबीआयने हा दशतवादी हल्‍ला असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे.

भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेबाराच्या सुमारास दोन्ही स्फोट झाले. या साखळी स्फोटांत अवघ्या 15 ते 20 सेकंदांचे अंतर होते. फिनिशलाइनपासून 250 मीटर अंतरावर पहिल्या प्रेक्षक गॅलरीत हे स्फोट झाले. फिनिश लाइन कॉप्ले प्लाझा हॉटेलजवळ होती. मेंडेरिन हॉटेलमध्ये एक जिवंत बॉम्बही पोलिसांच्या हाती लागला. तो निकामी करण्यात आला आहे. स्फोटांनंतर सुमारे 50 फूटांच्या पसिरात धुराचे प्रचंड लोळ उठले होते. त्यानंतर एकच पळापळ होऊन झालेल्या चेंगराचेंगरीत काही जण जखमी झाले आहेत. हल्ला दहशतवादी होता किंवा काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जर्सी शहरात वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नव्या टॉवरभोवती हेलिकॉप्टरने टेहळणी सुरू आहे. देशभर सुरक्षा यंत्रणेला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.