आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्‍यूयॉर्कमध्‍ये बंदूक घेऊन चिमुकला धडकला शाळेत!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्‍यूयॉर्क- शस्त्राशी संबंधित हिंसाचार रोखण्यासाठी अमेरिकेचे राष्‍ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी बुधवारी रात्री उशिरा 23 अध्यादेश जारी करुन बंदूक कायदा सुधारला. याला विरोध की काय म्‍हणून एक 7 वर्षांचा चिमुरडा चक्‍क शाळेत हॅण्‍डगन धडकला. त्‍यामुळे शाळेत खळबळ उडाली.

न्‍यूयॉर्कच्‍या वेव्‍ह प्रिपेटरी एलिमेंटरी स्‍कूलमध्‍ये हा प्रकार घडला. एक मुलगा .22 कॅलिबरची हॅण्‍डगन घेऊन शाळेत आला. हा प्रकार लक्षात येताच शाळेने तत्‍काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लगेच शाळेत पोहोचून बंदूक ताब्‍यात घेतली. मुलाची ओळख सांगण्‍यात आली नाही. तसेच बंदूक लोडेड होती अथवा नाही, हेदेखील सांगण्‍यात आले नाही.

अमेरिकेत काल बंदूक विक्री कायदा सुधारणांवर वादळी चर्चा झाली. अखेर ओबामा यांनी विधेयकातील सुधारणा मंजूर केल्‍या. अमेरिकेत दर 100 लोकांमध्ये 89 जणांकडे शस्त्र आहेत. लहान मुले शाळेत बंदुका घेऊन येतात. कोणीही वेडसर व्‍यक्ती उठून कुठेही गोळीबार करतो. गेल्‍या वर्षी 14 डिसेंबर रोजी सँडी हूक प्राथमिक शाळेत झालेल्या गोळीबारात 20 विद्यार्थी आणि सहा शिक्षक ठार झाले होते. अशा अनेक घटना अमेरिकेत घडल्‍या आहेत. देशातील वाढत्या हिंसाचारामुळे पीडित कुटुंबांचा ओबामांना पाठिंबा आहे, तर बंदूक लॉबीकडून त्याला विरोध होत आहे.