आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमचे येथे बॉयफ्रेंड भाड्याने देणे आहे!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - शीर्षक वाचून आश्चर्य वाटेल. परंतु चीनमध्ये अशा प्रकारची सेवा देणारे एक पोर्टल सुरू करण्यात आले आहे. ही सेवा ऑनलाइन असल्याने देशातील बॉयफ्रेंड नसलेल्या महिलांसाठी हे एक चांगले व्यासपीठ ठरणार आहे. सेवा देणार्‍या पोर्टलचे नाव ताओबाओ डॉट कॉम असे आहे. चीनमधील सर्वात मोठे ऑनलाईन मार्केटप्लेस म्हणून हे पोर्टल परिचित आहे. पुढील महिन्यात चिनी नवीन वर्ष सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही सेवा चांगली सुरू होईल. वर्षाची नवीन सुरुवात करताना अनेक लोक एकत्र येतात, असा मनोदय ताओबाओकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे एकाकीपणाचे जीवन जगणार्‍या लाखो महिलांना ऑनलाइन सेवेचा निश्चितपणे लाभ होईल, असा विश्वासही सेवा देणार्‍या या फर्मला वाटतो. मी ही सेवा देऊ केली आहे. कारण मी बोअर झाला आहे. कामाच्या ठिकाणी असलेल्या महिलांना मी चांगल्या प्रकारे ओळखू शकत नाही. त्यामुळे मी स्वत:ला दोन वेळा भाड्याने दिले आहे असे डिंग हुई हा 27 वर्षीय तरुण सांगतो. तो शांघायमधील प्लास्टिक कंपनीत सेल्समन म्हणून काम करतो.

कशी असेल सेवा
मित्र किंवा कुटुंबाच्या भेटीला जाताना हा भाड्याने आणलेला बॉयफ्रेंड सोबत राहू शकेल. त्याचबरोबर शॉपिंगला जाताना किंवा बाहेर जेवणाचा बेत असेल तरीही त्याला सोबत घेऊन जाता येणार आहे.

मि.राईटचेही सोल्यूशन
ज्या महिलांना अद्याप बॉयफ्रेंड नाही किंवा मिस्टर राइेटच्या शोधात असलेल्यांचा शोध येथे संपणार आहे. त्यांना या माध्यमातून बॉयफ्रेंड भाड्याने घेता येणार आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात
बॉयफ्रेंड भाड्याने घेण्याची कल्पना काही योग्य नाही. त्यांनी पालकांशी संवाद करावा. खोट्या जोड्यापासून दूर राहावे.
लिन शियुयॉन, प्रोफेसर, मानसशास्त्रज्ञ, बिजींग विद्यापीठ.