आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bradford Royal Infirmary 'heart Vest' Trial Launched ‎

बनियनद्वारे एक मिनिटात हृदयरोगाचे निदान

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - हृदयरोगाच्या निदानावर आता हमखास रिझल्ट देणा-या तंत्रज्ञानाचा शोध लावण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. एका मिनिटात हृदयरोगाचे संपूर्ण निदान करणारे बनियन शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे.
कन्व्हेंशनल इलेक्ट्रोकार्डिओग्राफी (एसीजी) अंतर्गत आतापर्यंत हृदयरोगाचे निदान केले जात होते. ही पद्धती गेल्या 60 वर्षांपासून वापरली जात आहे. तिच्या मर्यादाही स्पष्ट होऊन अनेक वर्षे उलटली. या पार्श्वभूमीवर हा शोध खूपच आशा पल्लवित करणारा ठरणार आहे.
ब्रिटनच्या ब्रॅडफोर्ड रॉयल इन्फर्मरी या रुग्णालयात हे तंत्रज्ञान बसवण्यात आले असून अशा पद्धतीचे इन्स्टंट निदान करणारे हे जगातील पहिलेच रुग्णालय ठरले आहे. या उपकरणाचे नाव ‘हार्टस्केप’ असे आहे. पूर्वीच्या तंत्रज्ञानामुळे निदान व्हायला विलंब होतो. रुग्णांना रक्ताची चाचणी करून घेण्यासाठी किमान 12 तासांचा वेळ द्यावा लागत होता. या उपकरणामुळे त्यावर मात करता येणार आहे, असे डॉ. जेम्स डनबर यांनी सांगितले. ते ब्रॅडफोर्ड रुग्णालयातील फिजिशियन आहेत. या उपकरणाचा उपयोग आम्ही प्रथम हाय रिस्क असलेल्या रुग्णांवर करणार आहोत. काही प्रयोगानंतर 2013 मध्ये सर्व रुग्णालयात हे उपकरण पुरवण्यात येणार आहे.