आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सततचा निद्रानाश मेंदूसाठी घातकच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा चोवीस ताम काम चालणा-या कंपन्यांमधील कर्मचा-यांना अनेकदा आपल्या झोपेशी तडजोड करावी लागते. काही कर्मचारी उशिरापर्यंत काम करतात, तर काहींना रात्रपाळीतही काम करावे लागते. मात्र झोपेशी चाललेला हा खेळ मेंदूसाठी धोकादायक ठरू शकतो. अमेरिकेत झालेल्या एका संशोधनात हे सिद्ध झाले आहे. निद्रानाशामुळे मेंदूतील पेशी नष्ट होऊ शकतात, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. सततची झोपमोड किंवा दीर्घकालीन निद्रानाशाने शरीरावरही दुष्परिणाम होत असल्याचे सिद्ध झाले आहे.