आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रयत्न करून कोणतेही काम वेळेत पूर्ण न करणा-या व्यक्तीला मेंदूचा गंभीर आजार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


57 वर्षांच्या जिम डंबर यांनी आयुष्यात कोणतेही काम वेळेवर केले नाही. एखादी परीक्षा असो किंवा दररोजचे एखादे काम, इच्छा असूनही ते योग्य वेळेवर करू शकले नाहीत. ते नेहमी उशीर झाल्याचे बहाणे शोधत असल्याचे मित्रांचे म्हणणे आहे. पण नुकतेच डॉक्टरांनी त्यांना ‘क्रॉनिक ब्रेन डिसऑर्डर’ नावाचा आजार झाल्याचे सांगितले आहे. यावर कोणताही उपाय नाही. ‘एखाद्या कामासाठी उशीर झाल्यास ती माझी चुकी नसल्याचे अनेकदा सांगूनही कुणीच माझे बोलणे गांभीर्याने घेतले नाही, असे जिम डंबर सांगतात. खूप प्रयत्न करूनही प्रत्येक ठिकाणी ते अर्धा तास उशिरा पोहोचतात. पाच वर्षांचे असल्यापासूनच शाळेला उशिरा पोहोचत असत. मोठेपणी याच कारणामुळे त्यांना अनेक नोकर्‍या गमवाव्या लागल्या. नुकतेच त्यांनी एक चित्रपट पाहायचे ठरवले होते. त्यासाठी वेळेवर पोहोचण्याचेही ठरवले. पण या वेळीही 20 मिनिटे उशीर झाला. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला. अनेक चाचण्या केल्यानंतर असे निदान करण्यात आले की, त्यांना अटेंशन डेफिसिट हायपर अँक्टिव्हिटी नावाचा मेंदूविषयक आजार झाला असून त्यामुळे एखादे काम करण्यासाठी किती वेळ लागेल याचा अंदाज मेंदूला लावता येत नाही. त्यांच्याकडे रेडिओ लहरींना जोडलेले एक विशेष घड्याळ आहे, पण तेसुद्धा उपयुक्त ठरत नाही. घड्याळ काही तास पुढे ठेवण्याची युक्तीही कधी सफल झाली नाही. 1 odditycentral.com