आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Brain Signal Make Man Disappointed, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेंदूतील संकेतांमुळे व्यक्ती होते खिन्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - मेंदूतील दुर्मिळ प्रकारच्या संकेतांमुळे व्यक्ती खिन्न होत असल्याचे एका संशोधनात सिद्ध झालंय. दोन न्यूरो ट्रान्समीटर्सद्वारे हे संकेत न्यूरोन्समधून दिले जातात. या संकेतांच्या प्रमाणानुसार तुम्ही किती उदास किंवा हताश आहात ते ठरत असते. ही मेंदूमध्ये फार दुर्मिळ होणारी प्रक्रिया आहे. मेंदूचे उत्तेजित होणे व दडपण घेणे यामुळे मानवी मनोवस्था सामान्यत: बदलत असते.
मात्र या तिस-या कारणाचा शोध कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या मेंदू विशेषज्ञांनी लावला आहे. डॉ. रोबर्टो मालीनो यांच्या टीमने न्यूरॉन्सवर संशोधन केले. या खिन्न करणा-या द्रव्याला गामा-अम्युनोब्युट्रिक अ‍ॅसिड असे वैद्यकीय नाव देण्यात आले आहे. नैराश्य विकारावर काही कायमस्वरूपी औषध निर्माण करता येईल का, यावर संशोधन सुरू आहे.