आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राझीलमध्‍ये जोडप्याने रडके मूल काढले विकायला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - ब्राझीलच्या जोडप्याने मुलाच्या विक्रीची वेबसाइटवर जाहिरात दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. त्यांनी त्याची किंमत 430 डॉलर ठेवली आहे. मुलगा खूप रडतो. आम्हाला तो झोपू देत नाही, असे या जोडप्याने म्हटले आहे.
निळ्या रंगाचा पोशाख घातलेल्या बाळाचे छायाचित्र वेबसाइटवर टाकण्यात आले आहे. छायाचित्राखाली दिलेल्या ओळीमध्ये लिहिले की, मूल खूप रडत असल्यामुळे झोप येत नाही. जगायसाठी मला काम करायचे आहे. ओएलएक्स वेबसाइटच्या छोट्या जाहिरातींमध्ये ही जाहिरात देण्यात आली आहे. गोएस पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. जाहिरात देणा-याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती बाल संरक्षण विभागाचे अधिकारी मार्सिला ओरसाई यांनी दिली.जर्नल डू ब्रासीलच्या वृत्तानुसार, जाहिरातीत इलिसोस नेबरहूड कॅम्पसचा पत्ता देण्यात आला आहे. तपासात मात्र तेथे कोणीही राहत नसल्याचे दिसून आले. यात दिलेला दूरध्वनी क्रमांकही लागत नाही. जाहिरात आणि ग्राहकाशी आपला संबंध नसल्याचे ओएलएक्सच्या हवाल्याने जर्नल डू ब्रासीलच्या वृत्तात म्हटले आहे. नियम व अटींचे उल्लंघन झाल्यामुळे वेबसाइटवरून जाहिरात काढण्यात आली आहे.