आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राझीलमध्ये तुरुंगात तीन कैद्यांचे शिरकाण, एक हजार कैद्यांमध्ये चकमक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साओ पाओलो- दक्षिणब्राझीलच्या एका तुरुंगात रविवारी हजार कैद्यांमध्ये झटापट झाली. याचे पर्यवसान दंगलीत झाले. यात कैदी मारले गेले, तर कैद्यांचे शिरकाण झाले.शिरकाण झालेल्या कैद्यांची अद्याप ओळख पटली नाही. यात दोन तुरुंग कर्मचाऱ्यांना कैद्यांनी बंदिस्त केले.
तुरुंगाचा मोठा भाग कैद्यांनी ताब्यात घेतला. काही जागांवर कैद्यांनी आग लावली. दक्षिण पॅरेना राज्यातील कस्कवेल तुरुंगात गटबाजीमुळे हे दंगे भडकले. कैद्यांनी सुिवधांची मागणी केली होती. या घटनेनंतर १२ तासांनी कैद्यांच्या मागण्यांवर विचार करण्यात येत असल्याचे तुरुंग अिधकारी एल्सम फॅक्सिना यांनी सांगितले.

जेलच्या इमारतीची व्यवस्थित देखभाल तसेच कैद्यांना बाहेरचे जेवण मागवण्याची मुभा, या प्रमुख मागण्यांसाठी कैद्यांमध्ये तणाव निर्माण झाला. या तुरुंगात हजार १४० कैदी असून क्षमता मात्र ९२८ कैद्यांची आहे. या दंगलीच्या वेळी कैद्यांना भेटण्यासाठी आलेले नातलग तुरुंगाबाहेरच होते. रात्रभर त्यांनी आपल्या नातलगांची चौकशी तुरुंग प्रशासनाकडे केली. मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. ब्राझीलच्या तुरुंगांमध्ये एकूण लाख कैदी आहेत.