आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Brazilian Beauty Pageant Winner Beaten Up By Runner Up

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO : सौदर्य स्पर्धेत उपविजेतीला राग अनावर, विजेतीच्या डोक्यावरील मुकूट फेकला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनोस - ब्राझीलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका ब्युटी कॉन्टेस्टमध्ये उपविजेत्या मॉडेलने विजेत्या मॉडेलच्या डोक्यावरून मुकूट हिसकावून फेकल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. स्पर्धेतील विजेतीची घोषणा होताच हा प्रकार घडला.
उत्तर ब्राझीलच्या मनोस येथे आयोजित मिस अमेझन 2015 कॉन्टेस्टमध्ये 20 वर्षीय कॅरोलिना तोलेडो हिला विजयी घोषित करण्यात आले. अखेरीस जेव्हा विजेतीला मुकूट देण्यात येत होता त्यावेळी उपविजेती शीस्लेन हयाला हिला संताप अनावर झाला. त्यानंतर 23 वर्षीय शीस्लेन हिने विजेतीला देण्यात आलेला मुकूट हिसकावत फेकून दिला. तसेच ज्युरीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्याबाबत अपशब्दांचा वापरही केला.

या प्रकारानंतर त्याठिकाणी उपस्थित असलेल्या आयोजकांनी लगेचच फेकण्यात आलेला क्राऊन उचलला आणि विजेतीला दिला. शुक्रवारी झालेल्या या घटनेबाबत शीस्लेन म्हणाली की, हा सर्व प्रकार पैशाच्या जोरावर करण्यात आला. माझ्याबरोबर धोका झाला आहे, अशा शब्दांत तिने उत्तर दिले.

दरम्यान, विजेतीने याबाबत काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. अशा प्रकारचे वागणे हे अविश्वसनीय असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुःख झाले असे ती म्हणाली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, VIDEO