आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Brazilian Jail Breakout After Three Women Lure Guards For Orgy

सुरक्षा रक्षकांवर यौवनाचे जाळे टाकून ललनांनी तुरुंगातून पळवले 28 कैदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्राझील - तुरुंगातून कैदी पळून जाण्याची घटना जगभरात घडत असते मात्र, ब्राझील मधील क्युएबा येथील नोव्हो मुटूम तुरुंगातून 28 कैदी फरार होण्याची पद्धत अनोखी आणि 'टोटल फिल्मी' असल्याचे समोर आले आहे. तीन महिला मध्यरात्रीनंतर उत्तेजक कपडे परिधान करुन आल्या. त्यांनी सुरक्षा रक्षकांना सेक्स पार्टीची ऑफर देऊन फसवले आणि कैद्यांना पळून जाण्यास मदत केल्याचे सांगितले जात आहे.
तपासाधिकार्‍यांनी सांगितले, की तीन तुरुंग रक्षक विवस्त्र अवस्थेत हतकडी लावून एका खोलीत बांधून ठेवलेले सापडले. त्यांच्या सांगण्यानुसार, पाहाटे तीन वाजता उत्तेजक कपडे परिधान करुन आलेल्या तीन महिलांनी सुरक्षा रक्षकांना सेक्स पार्टीची ऑफर दिली. तेही त्यांच्या बोलण्याला भाळले आणि ते महिलांना घेऊन जेल कॉर्टर्समध्ये गेले. तिथे महिलांनी त्यांना गुंगीचे औषध मिळवलेली दारू पाजली. त्यानंतर बेशुद्ध पडलेल्या सुरक्ष रक्षकांना हतकडी लावून त्यांच्याकडील चाव्या घेऊन महिलांनी पोबारा केला.
स्थानिक पोलिस प्रमुख अँजेलिना फेरेरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, 'सुरक्ष रक्षकांना फसवण्याची पद्धतशीर योजना तयार करण्यात आली. महिलांनी गुंगीचे औषध मिळविलेली व्हिस्की त्यांना पाजली आणि मुख्य प्रवेश दाराशिवाय सर्वच कोठड्यांचे दरवाजे उघडले. या महिलांच्या मदतीने मुख्य प्रवेशद्वारातून 28 कैद्यांनी पलायन केले. सुरक्ष रक्षकांना व्हिस्की प्यायल्यानंतर काय घडले ते काहीच आठवत नाही. तुरुंगातून फरार झालेल्या कैद्यांनी शस्त्र देखील पळवली आहेत.'
पोलिसांना घटनास्थळी एक बॅग सापडली, त्यात महिलांची उत्तेजक अंतरवस्त्रे आणि पोलिसांचा गणवेश मिळाला. तुरुंगात अर्धनग्न अवस्थेत बेशुद्ध असलेल्या एका सुरक्षा कर्मचार्‍याचे छायाचित्र पोलिसांनी लिक केले आहे. हे छायाचित्र सोशल मीडियावर हजारोवेळा शेअर केले गेले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनास्थळाची संबंधीत छायाचित्रे