आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HORRIBLE: किंचाळण्याचा आवाज ऐकण्यासाठी घेतला 41 महिलांचा जीव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्राझील - ब्राझील पोलिसांनी एका अशा व्यक्तीला अटक केली आहे, ज्याने 9 वर्षांमध्ये 41 खून केले. रियो दी जेनेरियो येथील 26 वर्षांच्या सॅल्सन जोस डॅस ग्रेक्स याने नऊ वर्षांमध्ये चाळीसहून अधिक हत्या केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याचा हत्या करण्याचा उद्देश हा फक्त मरताना महिला कशा ओरडतात हे पाहाणे एवढाच होता. पोलिस तपासात ग्रेक्सने याचा खुलासा केला.
पोलिस तपासात आरोपीने सांगितले, की त्याने हत्या केलेल्या बहुतेक महिला या गोर्‍या रंगाच्या होत्या. खून करण्याआधी एक महिना तो त्या महिलेसंबंधीची सर्व माहिती जाणून घेत होता. त्या महिलेवर एक प्रकारे तो संशोधनच करत होता. एका टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले, 'मला महिलांना मरताना आयुष्याची भिक मागताना, जीवाच्या अकांताने ओरडताना पाहण्यात मजा येते.' त्याने कबुली दिली आहे, की नऊ वर्षांमध्ये त्याने 38 महिला, दोन पुरुष आणि एका दोन वर्षांच्या मुलाचा खून केला आहे.
रेकी करुन हत्या
ग्रेक्सने पोलिसांना सांगितले, ' मी शिकारीवर एक महिना नजर ठेवत होतो. महिलेचा पूर्ण अभ्यास करत होतो. ती सकाळी केव्हा बाहेर पडेत. घरात किती लोक आहेत. रहिवासी भाग कसा आहे. या सर्वांची माहिती घेत असे. महिला जेव्हा रस्त्यावर चालत असेल, तेव्हा तिच्या हावभावांचे बारकाईने निरीक्षण करीत होतो.' त्याने सांगितले, 'खून करण्यासाठी मला सकाळची वेळ फायदेशीर होती. तेव्हा मला अधिक वेळ मिळत असे.' त्याने कबूल केले आहे, की जी महिला पुढची शिकार असेल तिच्यावर चौकापासून बेकरीच्या दुकानापर्यंत जिथे जाईल तिथे तिच्यावर नजर ठेवत होतो.
ब्राझील पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये हेनरिक गोम्य या 26 वर्षे वयाच्या युवकाला अटक केली होती. त्याने बेचैनी दूर करण्यासाठी 39 लोकांचा खात्मा केला होता.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, खूनाशी संबंधीत छायाचित्रे...