आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्करोगाच्या चाचणीसाठी आता श्‍वासाचे सँपल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक व्यक्तीच्या उच्छ्वासात वेगवेगळे घटक असतात. त्यामुळे आता श्वासावरून विविध आजारांचे निदानही केले जाऊ शकते. श्वासोच्छ्वासावाटे बाहेर पडणारे पदार्थ शरीरात तयार झालेल्या रसायनांविषयी माहिती देऊ शकतात. शास्त्रज्ञांच्या मते, उच्छ्वासावाटे बाहेर पडलेले घटक हे वैद्यकीय चाचण्यांसाठी रक्त किंवा मुत्राच्या नमुन्यांइतकेच महत्त्वाचे असतात. श्वासाच्या तपासणीने रुग्णाला कोणताही त्रास होत नाही तसेच निदानही लवकर होते. त्यामुळे डोपिंग किंवा अ‍ॅनेस्थेशियाच्या तपासासाठी ही चाचणी जास्त फायद्याची ठरू शकते. ज्युरिखच्या स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे सुरू असलेल्या या अध्ययनाचे प्रमुख रेनाटो जेनोबी यांच्या मते, श्वासाचा वैद्यकीय चाचण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जाऊ शकतो. पारंपरिक चिनी उपचारांत डॉक्टर नाडी किंवा जीभ पाहत व श्वास हुंगतात. काही प्रशिक्षित डॉक्टर केवळ वास घेऊन कर्करोगाचे निदान करतात, पण त्यात कोणकोणते घटक असतात हे सांगू शकत नाहीत. यापूर्वीच्या संशोधनात स्पष्ट झाले आहे की, फुप्फुसाचा संसर्ग किंवा पोटाचा कर्करोग असल्यास त्याचे जिवाणू श्वासावाटे ओळखता येतात. स्वेच्छेने प्रयोगासाठी तयार झालेल्या 11 रुग्णांचे परीक्षण करून रेनाटोने हा निष्कर्ष काढला आहे.

bbc.co.uk