आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : श्वास रोखून धरायला लावणारे आहेत हे प्लॅटफॉर्म

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्लॅटफॉर्म हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यांसमोर चित्र उभे राहते ते गर्दीचे. या गर्दीतील काहींच्या हातात कधी एखादी पिशवी किंवा पाठीवर सॅग असते तर, काही जणांकडे अवजड ओझे, विविध रंगांच्या बॅग्ज असतात... लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांची वेगळीच धांदल सुरू असते. गाड्यांची ये-जा सुरू असते. काही जण कुणाच्यातरी वाटेकडे डोळे लावून असतात तर, काहींच्या डोळ्यात विरहाचे दुःख असते... कोणत्यातरी कोप-यातून गाड्यांच्या उदघोषणां कानावर येत असतात... या प्लॅटफॉर्मचे जगच वेगळे असते... इथे प्रत्येकाला घाई असते...

काही लोकांना प्लॅटफॉर्मवर फिरायला देखील आवडते. आज आम्ही तुम्हाला जगातील अशा प्लॅटफॉर्मची माहिती देणार आहोत ज्यांचे स्वतःचे एक वेगळेपण आहे. या गगनचुंबी प्लॅटफॉर्मवर सैर करण्याची मजाही काही वेगळीच आहे.

जर, तुम्हाला साहसी सफरी करण्याची आवड असेल तर, या प्लॅटफॉर्मला नक्की भेट द्या. ही छायाचित्रे पाहून तुमची सफर अविस्मरणीय ठरणार याचा अंदाज नक्कीच येईल. यातील पहिले छायाचित्र आहे, सुमद्रसपाटीपासून २७०० मीटर उंचीवरली एका प्लॅटफॉर्मचे.