आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BRICS Development Bank Launched, First President To Be From India

BRICS देश बनविणार 6 लाख कोटी रुपयांची बँक, पहिल्या अध्यक्षाचा मान भारताला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोर्तलेजा (ब्राझील) - ब्राझीलमध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स शिखर संमेलनात भारताच्या हाती मोठे यश लागले आहे. अमेरिका आणि युरोपातील इतर दुसर्‍या देशांवर आर्थिक बाबतीतील निर्भरता कमी करण्यासाठी ब्रिक्स देशांनी विकास बँकेच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. 50 अब्ज डॉलरची प्रारंभीक गुंतवणूक असणार्‍या या बँकेचा पहिला अध्यक्ष भारतातून होणार आहे. बँकेचे मुख्यालय चीनमधील शांघाय येथे असणार आहे. या संमेलनात विकास बँकेशिवाय आपत्तीला तोंड देण्यासाठी 'कंटिजेंट रिझर्व्ह अरेंजमेंट'ची स्थापना करण्यासंबंधीचा करार करण्यात आला आहे.
ब्रिक्स देशांची स्वतःची बँक
ब्रिक्स शिखर संमेलनात 50 अब्ज डॉलरची सुरवातीची गुंतवणूक असणार्‍या विकास बँकेच्या स्थापनेवर सर्व देशांचे एकमत झाले. बँकेच्या स्थापनेनंतर ही गुंतवणूक 100 अब्ज डॉलरपर्यंत वाढवली जाऊ शकते. बँकेसाठी पाचही देशे समान रक्कमेची गुंतवणूक करणार आहेत. ही बँक मुलभूत सुविधांसह सततच्या विकासासाठी साधनसामग्री आणि त्याच्या योग्य उपयोगासाठी विकसनशील देशांना मदत करणार आहे.
भारताचे यश आणि सर्वांना बरोबरीचे स्थान
भारताने आधीपासूनच या बँकेच्या स्थापनेचे समर्थन केले असून त्यावर कोणत्याही एका देशाचे वर्चस्व नको अशी भूमिका घेतलेली आहे. ब्रिक्स देशांनी भारताच्या या भावनांचा विचार केला आहे. या बँकेचे मुख्यालय चीनमध्ये असणार आहे, तर बँकेचा पहिला अध्यक्ष हा भारताचा असणार आहे. बँकेच्या पहिल्या संचालक मंडळावर ब्राझीलचा दबदबा राहील तर बँकेचे एक उपकेंद्र दक्षिण अफ्रिकेत असणार आहे.

आयएमएफ आणि वर्ल्ड बँकेला देणार आव्हान
'ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक’ उभारण्यामागचा उद्देश या पाच राष्ट्रांना संकटकालिन आर्थिक तरतूद करण्याचा आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि जागतिक बँकेवर अवलंबून राहाण्याची गरज कमी होईल. ब्राझील, रशिया, इंडिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश असलेल्या ब्रिक्स देश अमेरिका आणि युरोपिय देशांवरील अवलंबीत्व कमी होण्यास मदत होईल.

(छायाचित्र - ब्राझीलमध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स शिखर संमेलनात रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ब्राझीलच्या राष्ट्रपती डिल्मा रुजेफ, चीनचे राष्ट्रपती शी जिनपींग आणि दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्रपती जॅकम जुमा)