Home »International »Bhaskar Gyan» Brics Issue

कायम राहील का डॉलरचा दबदबा?

डीबी स्टार. नेटवर्क | Apr 17, 2012, 06:49 AM IST

  • कायम राहील का डॉलरचा दबदबा?

ब्रिक्स देशांच्या समूहाने अमेरिकेसह पाश्चात्त्य देशांना आव्हान देत एक विकास बँक बनवण्याची आणि देशी चलनात व्यापार करण्याची शिफारस केली आहे. त्यासाठी भारत, चीन, रशिया, ब्राझील व दक्षिण आफ्रिकेने दोन करारांवर स्वाक्ष-या केल्या आहेत. जाणकारांच्या मते, त्यामुळे जागतिक पातळीवर पाश्चात्त्य देशांच्या आर्थिक प्रभुत्वास आव्हान मिळेल, सोबतच ब्रिक्स देशांची अर्थव्यवस्थाही मजबूत होईल.
आंतरराष्ट्रीय व्यापारात अनेक दशकांपासून अमेरिकन डॉलरचे वर्चस्व आहे. त्याचा थेट फायदा अमेरिकन आर्थिक प्रणाली व अमेरिकन ग्राहकांना झाला आहे. याच कारणामुळे अमेरिकन सरकारही अनेक दशकांपासून स्वत:ला जगाचा मुकुटमणी समजत आहे. आजतागायत परकीय गंगाजळीत 60 टक्क्यांहून अधिक वाटा अमेरिकन डॉलरचा आहे; पण आता आर्थिक स्थिती बदलत आहे. अमेरिकेची प्रसारमाध्यमे भलेही या विषयावर मौन बाळगून आहेत. मात्र जगातील अनेक मोठ्या अर्थव्यवस्था अमेरिकन डॉलरला टाटा करत आहेत. अनेक तेल उत्पादक देश आता डॉलरव्यतिरिक्त इतर देशांच्या चलनात व्यापार करत आहेत. जाणकारांच्या मते, डॉलरचा वापर कमी करण्यात चीनचा सर्वात मोठा हात आहे. चीन दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. एका अंदाजानुसार 2016 पर्यंत ती सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. 2040 पर्यंत चिनी अर्थव्यवस्था अमेरिकेपेक्षा तिपटीने वाढण्याची शक्यता आहे.
डॉलरचा दबदबा डॉलरचा वापर आंतरराष्ट्रीय बाजारात चलनाचे प्रमाणित घटक म्हणून केला जातो. अनेक बिगर अमेरिकन कंपन्यासुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या उत्पादनांची किंमत अमेरिकन डॉलरमध्येच निश्चित करतात. रिझर्व्ह करन्सीच्या रूपात संपूर्ण जगात डॉलरचा सर्वाधिक वापर केला जातो. अनेक देशांच्या केंद्रीय बँका आणि आर्थिक संस्थांसह अनेक मोठ्या खासगी संस्थादेखील अमेरिकन डॉलरचाच वापर करतात.
अनेक देश आपल्या देशाच्या चलनाच्या नियमनासाठी विनिमय दर निश्चित करतात. त्याच आधारावर डॉलरच्या तुलनेत त्यांच्या चलनाची किंमत निश्चित होते. अनेक देशांच्या आर्थिक संस्था आणि बँका, ज्या परदेशी चलनाचा साठा करतात, त्यात सर्वात जास्त अमेरिकन डॉलरच असतो. आंतरराष्ट्रीय व्यापारात आयात व निर्यातीदरम्यान होणा-या देवाणघेवाणीतही सर्वात जास्त वापर अमेरिकन डॉलरचाच होतो. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक बाजारात डॉलरचा जवळपास 80 टक्के वापर होतो. युरोच्या तुलनेत हा वापर दुप्पट आहे. आंतरराष्ट्रीय पत बाजारातही अमेरिकन डॉलर हेच सर्वात महत्त्वाचे चलन आहे.
देशी चलनात व्यापाराचे फायदे
> सर्व देशांच्या करन्सी रिझर्व्हमध्ये (राखीव चलन) वैविध्य येईल.
> डॉलर व युरोसारख्या चलनावरील अवलंब कमी होईल.
> इतर देशांच्या चलनाच्या तुलनेत आपल्या चलनाचा वापर वाढेल.
> अमेरिका व युरोपसारख्या ठिकाणी आर्थिक मंदी आल्यानंतरही व्यापारावर परिणाम नाही.
> कर्ज देताना वा रक्कम अदा करताना विनिमय दरात चढउताराचा परिणाम नाही.
> सर्व देश आयात-निर्यात आपल्या चलनात करू शकतील. त्यामुळे व्यापार व गुंतवणूक दोन्ही वाढेल.
जगात असे वाढले होते महत्त्व
1944 मध्ये आयोजित ब्रेटन वुड्स कॉन्फरन्समध्ये जगाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी 44 देशांनी सहभाग घेतला. याच परिषदेत इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट या आर्थिक संस्थांच्या स्थापनेसाठीच्या करारावर स्वाक्ष-या करण्यात आल्या. त्यानंतर डॉलरला ओळख मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात पारदर्शकता आणि नियंत्रण आणण्यासाठी डॉलरचा वापर करण्यात आला. त्यामुळे डॉलरला ग्लोबल रिझर्व्ह करन्सी म्हणून ओळख मिळाली.ब्रिक्स देश ३ ब्रिक्स देशांनीही असा निर्णय घेतला आहे की, ते एकमेकांशी डॉलरऐवजी आपापल्या चलनांमध्ये व्यापार करतील.
रशिया-चीन करार ३ दोन्ही देश एकमेकांशी जवळपास वर्षभरापासून आपल्या चलनात व्यापार करत आहेत. दोन्ही देशांचे नेते एका नव्या ग्लोबल रिझर्व्ह करन्सीची (जागतिक राखीव चलन) मागणी करत आहेत. आफ्रिकेत युआन ३ चीनच्या युआन या चलनाचा वापर आफ्रिकेत वाढत आहे. 2009 मध्येच चीन आफ्रिकेचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला होता. अनेक आखाती देशांसोबतही चीनने आपापल्या चलनात व्यापार सुरू केला आहे. बदलाची मागणी ३ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि संयुक्त राष्ट्र संघटनेनेही अमेरिकन डॉलरच्या जागी नव्या रिझर्व्ह करन्सीची वकिली केली आहे. सोबतच जगातील अनेक देशांनी डॉलरच्या रिप्लेसमेंटची मागणी केली आहे.
आगामी काळ चिनी चलनाचाअमेरिकेत 2008 मध्ये आलेली मंदी आणि नंतर युरो संकटावरून सिद्ध झाले की, डॉलर व युरोवरील अवलंब कमी करण्याची वेळ आली आहे. आपल्या चलनात संपूर्ण जगाने व्यापार करावा, अशी चीनची इच्छा आहे. तसा येणारा काळ चीनच्या चलनाचाच आहे.
मनीष ठाणावाला, चलनतज्ज्ञ

Next Article

Recommended