आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववधुंना ट्रेनिंग देणारी शाळा; शिकविली जाते भाषा आणि संस्कृती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिएतनाम- दक्षिण कोरियातील विविध शहरात अनोखे ट्रेनिंग सेंटर उघडण्‍यात आले आहे. या ट्रेनिंग सेंटरमध्ये नववधुंना कोरियन संस्कृती आणि भाषा शिकविली जाते. कोरियन भाषा शिकण्यासाठी एक किंवा तीन दिवस लागतात.

दक्षिण कोरियात मेल-ऑर्डर विवाह होण्याचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. या विवाहात वर आणि वधू एकमेंकांना ओळखत नाहीत. विशेष म्हणजे त्यांना एकमेकांची भाषाही येत नाही. त्यामुळे नववधुला आपल्या भावी पतीची भाषा आणि सासरवाडीच्या संस्कृतीबाबत माहिती असण्याचा प्रश्नच येत नाही. मेल- ऑर्डर विवाह जसे झटपट जुळतात तसे तुटतातही. संभाषणात अडथळा हे यामागील प्रमुख कारण असते.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, नववधुंना शिकविली जाते भाषा आणि संस्कृती...
(संग्रहीत छायाचित्र)