आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Britain Invovlment In Blue Star Operation, Britain Foreign Minister Disclose In Parliament

ऑपरेशन ब्ल्यू स्टारमध्ये ब्रिटनचा सहभाग उघड,ब्रिटिश परराष्‍ट्रमंत्र्याचा संसदेमध्ये गौप्यस्फोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - अमृतसरच्या सुवर्णमंदिरात 1984 मध्ये झालेल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टारमध्ये ब्रिटनचा सहभाग होता हे आता सिद्ध झाले आहे. ब्रिटनचे परराष्‍ट्रमंत्री विल्यम हेग यांनी मंगळवारी ब्रिटिश संसदेला याबाबतची माहिती दिली.
सुवर्णमंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी ब्रिटनने भारताला सल्ला दिला होता, मात्र तो मर्यादित स्वरूपाचा होता, असे हेग यांनी सांगितले. ऑपरेशन ब्ल्यू स्टारवेळी ब्रिटनच्या तत्कालीन पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी इंदिरा गांधी यांना कथित मदत केल्याचे प्रकरण समोर आले होते. काही गोपनीय दस्तऐवज प्रसिद्ध झाल्याने हे गुपित उघड झाले. यानंतर ब्रिटन सरकारने या प्रकरणाची चौकशी केली. याबाबतचा अहवाल मंगळवारी हेग यांनी संसदेत सादर केला.
ब्रिटनने सल्ला दिला, मात्र तो शुद्ध स्वरूपात सल्लाच होता, असे हेग म्हणाले. भारताने आखलेल्या योजनेच्या पहिल्या टप्प्याचा तो भाग होता. या प्रकरणाच्या तपासासाठी विश्लेषकांनी 200 फाइल्स आणि 23 हजार दस्तऐवज तपासले.
तपासातील निष्कर्ष
सुवर्णमंदिरात जून 1984 मध्ये वास्तवात झालेले ऑपरेशन ब्ल्यू स्टार ब्रिटनच्या सल्ल्यापेक्षा भिन्न होते, असे तपास करणा-या कॅबिनेट सचिवाच्या अहवालावरून स्पष्ट होते. ब्रिटनच्या सल्ल्यापेक्षा ते वेगळे होते. सल्लागाराच्या सल्ल्याचा मर्यादित परिणाम झाला होता.
ऑपरेशन कमांडरने म्हटले होते :
ऑपरेशन ब्ल्यू स्टारचे कमांडर लेफ्टनंट जनरल ब्रार होते. आपल्या कारवाईच्या योजनेत बाहेरच्या व्यक्तीची कोणत्याही प्रकारे मदत घेण्यात आली नव्हती, असे त्यांनी म्हटले होते.
काय आहे प्रकरण
ब्रिटिश दस्तऐवजानुसार, एका ब्रिटिश लष्करी सल्लागाराने 8 ते 19 फेब्रुवारी 1984 दरम्यान भारताचा दौरा केला होता. भारतीय गुप्तचर विभागाला कारवाईबाबत सल्ला देणे हा त्यामागचा उद्देश होता.