आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Britain Launches 'super Priority' Same day Visa Service For Indians

व्हिसाची चिंता सोडा,कधीही निघा ब्रिटनला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनला तातडीने जायचे आहे, परंतु व्हिसाचे काय? आता ही चिंता सोडा. कारण लवकरच भारतातून ब्रिटनला तातडीने प्रवास करू इच्छिणार्‍या नागरिकांसाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी सुपर प्रायोरिटी व्हिसा सेवेची घोषणा भारत दौर्‍यावर असताना फेब्रुवारीमध्ये केली होती. त्यानुसार तातडीने प्रवास करण्यासाठी ही सुविधा दिली जाणार आहे. ही सेवा इतर कोणत्या देशांऐवजी भारतातून सुरू झाल्याचा मला आनंद वाटतो, असे ब्रिटनचे भारतातील उच्चायुक्त जेम्स बेव्हन यांनी म्हटले आहे. 2015 पर्यंत भारत-ब्रिटन यांच्यातील व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. व्हिसाची नवीन सुविधा त्या दृष्टीने अधिक फायद्याची ठरेल. सुविधा सहा महिने, दोन वर्षांसाठी लागू असेल. भारतातून दरवर्षी ब्रिटनला जाणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी असते. सुमारे 4 लाख अर्ज दरवर्षी असतात. यातील 97 टक्के अर्जदार उद्योगविषयक भेटीसाठी इच्छुक असतात. त्यापैकी सरासरी 86 टक्के अर्जांना परवानगी दिली जाते.

कशी आहे सुविधा ?
प्रवास करायच्या दिवशी शॉर्ट नोटीसवर हा व्हिसा उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे व्हिसाची प्रतीक्षा करावी लागणार नाही. त्याचा फायदा उद्योग क्षेत्रातील लोकांना अधिक होणार आहे. कारण ऐनवेळी आणि तातडीने ठरणार्‍या प्रवासात ही सुविधा वरदान असेल, त्यासाठी सकाळी साडेनऊच्या अगोदर ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. त्यानंतर हा व्हिसा त्याच दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता नवी दिल्ली किंवा मुंबईत तयार असेल. या सुविधेसाठी 600 पाउंड्स अधिक मोजावे लागतील.