आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Britain News In Marathi, Cantainer, Divya Marathi

ब्रिटनमध्ये कंटेनरमधून 35 जणांची सुटका,घुसखोरीचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - पूर्व ब्रिटनमध्ये एका जहाजातील कंटेनरमधून 35 जणांची सुटका करण्यात आली. सर्वांना अमानुषपणे नेले जात होते. त्यात एकाचा मृत्यू झाला असून उर्वरित नागरिकांवर उपचार सुरू आहेत.

कंटेनरमधील नागरिक बहुतांश आशियातील असून त्यातही पंजाबचे असल्याचे सांगण्यात येते. पकडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये महिला-मुलांचाही समावेश आहे. सध्या तरी पोलिस त्यांना मानवी तस्करीतील पीडित मानत आहे. थेम्स नदीच्या किना-यावरील बंदरावर जहाज रिकामे करण्यात आले. त्या वेळी या कंटेनरची माहिती मिळाली. हे लोक बेकायदा ब्रिटनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांना हे सर्व बेशुद्धावस्थेत आढळून आले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. हे जहाज बेल्जियमच्या जिब्रगे येथून ब्रिटनमध्ये दाखल झाले होते. एका कंटेनरमधून काही लोकांच्या वेदना, आरडाओरडा ऐकून आल्यानंतर बंदरावरील कर्मचा-यांनी कंटेनर उघडून पाहिला. इतर कंटनेरचादेखील तपास करण्यात
येत आहे.