आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनच्या राणीच्या पगारात 22 टक्के वाढ,महागाईमुळे सरकारचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ दुसरी यांनाही महागाईचा फटका बसला आहे. महागाईमुळे महाराणीच्या खर्चात इतकी वाढ झाली की, त्यांच्या खात्यात असलेली बचतीची रक्कम घटून 10 लाख पाउंड (सुमारे 9 कोटी 75 लाख रुपये) एवढीच शिल्लक राहिली आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्या पगारामध्ये 22 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

नॅशनल ऑडिट ऑफिस (एनएओ) ने नुकताच महाराणीच्या खात्याचा ऑडिट रिपोर्ट सादर केला. एनएओला प्रथमच महाराणीला दिल्या जाणार्‍या रकमेचा वेगवेगळा हिशेब ठेवण्याचे काम सोपवण्यात आले आहे. या अहवालानुसार महाराणीच्या घरगुती खर्चामध्ये 379 लाख पाउंड एवढी वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 20 वर्षांपासून नियमितपणे महाराणीला दिली जाणारी रक्कम सरकारतर्फे घटवली जात होती. महाराणीला वर्षाला सुमारे 44,724 पाउंड पगार मिळतो.