आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Britain Royal Family Chewing Gum Remover Job International News In Marathi

ब्रिटनच्या महाराणीला हवाय सफाई कर्मचारी, च्युंइगम उचलण्यासाठी 16 लाखांचे पॅकेज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्रिटनची महाराणी एलिझाबेथला तिच्या राजवाड्यातील च्युंइगम उचलण्यासाठी एका कर्मचार्‍याची गरज आहे. या कामासाठी वार्षिक 16 हजार पौंड म्हणजे जवळपास 16 लाख रुपये पगार दिला जाणार आहे. विशेष म्हणजे हा जॉब पार्ट टाइम आहे. आठवड्यातील फक्त पाच दिवस रोज चार तास महालात इकडे-तिकडे पडलेले, चाऊन-चाऊन फेकलेले च्युंइगम उचलायचे आहेत.
ब्रिटनच्या शाही परिवाराला सध्या पाहुण्यांचा भलता त्रास होत आहे. एडनबर्ग येथील होलीरुड हाऊस येथे येणारे व्हिजीटर्स च्युंइगम चाऊन इकडे-तिकडे फेकून देतात. त्यामुळे शाही कुटुंबाला पाहुण्यांच्या या वागणूकीचा त्रास होत आहे. त्यांनी स्वच्छतेसाठी एका व्यक्तीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे आजच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीनिमीत्त 'स्वच्छ भारत अभियान' सुरु केले आहे.
नोकरीसाठी पात्रता
या पदासाठी इच्छुकाचे वजन कमी असले पाहिजे. अर्जदार ब्रिटनचा नागरिक असला पाहिजे. त्याला राजवाड्यातील फ्लोअर आणि फर्निचरवरुन च्युंइगम शोधून ते खरवडून काढता आले पाहिजे. त्याशिवाय महाराणी महालात असेल तेव्हा पायर्‍या स्वच्छ कराव्या लागतील आणि भांडी देखील घासावी लागतील. त्याला स्वच्छता करण्याची प्राथमिक माहिती असली पाहिजे. शाही परिवाराच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या जाहिरातीत स्पष्ट करण्यात आले आहे, की त्यांना अशी व्यक्ती हवी आहे, ज्याला आपल्या कामात आनंद वाटले आणि त्याचा गर्व वाटेल. सहकार्‍यांची मदत करण्यात तो पुढे असला पाहिजे आणि त्याला वेळेचे महत्त्व देखील असले पाहिजे.