आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अवकाळी हिमवृष्टीमुळे युक्रेन, रशिया, ब्रिटन ठप्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेन, रशिया आणि ब्रिटनला अवकाळी हिमवृष्टीचा फटका बसला आहे.जगातील इतर देशांमध्ये वसंत ऋतूचे आगमन होत असताना हे देश मात्र अद्याप थंडीने गारठलेले आहेत.

रशियात दुप्पट बर्फवृष्टी
@मॉस्कोत गेल्या दोन दिवसांपासून बर्फवृष्टी सुरू आहे.
तापमान उणे 8 डिग्री सेल्सियस झाले आहे.
@तज्ज्ञांच्या मते मॉस्कोमध्ये हिवाळ्यापासून आतापर्यंत 10 फूट बर्फवृष्टी झाली आहे. सरासरीपेक्षा ही दुप्पट बर्फवृष्टी आहे.
@एवढेच नव्हे तर तापमानही हिवाळ्यापेक्षा 10 डिग्री अधिक घटले आहे.

ब्रिटन : 40,000 घरांतील वीज गायब
@ब्रिटनमध्ये बर्फवृष्टीमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. रस्ते बर्फाखाली दबले आहेत. घरातील वीज, पाणीपुरवठा बंद पडला आहे.
@रविवारी लँकेशायरमध्ये एक मृतदेह सापडला होता. येथे सुमारे 40 हजार घरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून सरकारी यंत्रणा मदतकार्यात
गुंतली आहे.

युक्रेन : उणे 28 डिग्री सेल्सियस
युक्रेनमध्ये मार्च महिन्यातच गारठय़ाने 37 जण मृत्युमुखी पडले आहेत.
बहुतांश भागात तापमान उणे 8 डिग्री सेल्सियसपर्यंत घसरले आहे.
राजधानी किवमध्ये 21 इंच जाडीचे बर्फाचे थर पडले आहेत.