आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Britain Sending Secreat Information Hacker Ravi Shankaran To India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुप्त माहिती चोरणा-या रवी शंकरनला ब्रिटन पाठवणार भारतात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - वायुसेनेतील गुप्त माहिती चोरल्याचा आरोप असलेल्या रवी शंकरनने ब्रिटनमधून भारतात पाठवण्याच्या ब्रिटन सरकारच्या निर्णयास दिलेले आव्हान ब्रिटिश न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावले.
सन 2006 मध्ये वायुसेना आणि नौसेनेची गुप्त माहिती चोरल्याचा आरोप असलेल्या शंकरनची विनंती इव्हान्स येथी जिल्हा न्यायाधीश निकोलॅड इव्हान्स यांनी फेटाळून लावली. त्यामुळे आता ब्रिटिश गृह सचिव थेरेसा मे शंकरनला भारतात परत पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील.

46 वर्षांचा शंकरन नौसेनेतून कमांडर पदावरून निवृत्त झाला असून, तो माजी नौदल प्रमुख अरुण प्रकाश यांचा नातेवाईक आहे. शस्त्र पुरवठादारांना नौसेनेच्या गुप्त माहितीची 7000 पाने चोरून पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. 2006 मध्ये सीबीआयमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर शंकरन फरार झाला होता. मे 2006 मध्ये सीबीआयने त्याचा पासपोर्ट रद्द करून त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्याला भारतात पाठवावे, अशी विनंती 2007 मध्ये ब्रिटनला करण्यात आली होती. दिल्लीच्या न्यायालयाने जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटप्रमाणे एप्रिल 2010 मध्ये ब्रिटिश प्रशासनाने त्याला अटक केली होती.