आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Britain Stages Grand Funeral For Iron Lady Margaret Thatcher

लंडनची बीग बेन आज थांबणार, अर्धशतकानंतर एखाद्या नेत्याला दिला जाणार असा निरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडनमध्ये अर्धशतकानंतर एका मोठ्या राजकीय व्यक्तिवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ब्रिटनच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या अंत्ययात्रेत विविध देशांचे नेत्यांसह, ब्रिटनची महाराणी आणि त्यांच्या परिवारातील सदस्यही सहभागी होणार आहेत. 'आयर्न लेडी' म्हणून ओळखल्या गेलेल्या थॅचर यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या अंत्ययात्रेच्या तयारीची तुलना माजी पंतप्रधान विंस्टन चर्चील यांच्या अंत्ययात्रेशी केली जात आहे. ब्रिटनने दुसरे महायुद्ध चर्चील यांच्या नेतृत्वात लढले होते.

थॅचर यांचा मृतदेह असलेली शवपेटी एका बग्गीतून संसदेतून सेंट पॉल कॅथड्रेलपर्यंत आणली जाईल. यावेळी तिथे त्यांचे प्रशंसक आणि विरोधी पक्षाचे खासदार देखील उपस्थित राहाणार आहेत. त्यांच्या अत्यंयात्रेस जगभरातून 2300 लोक उपस्थित राहाणार आहेत. यात, 11 देशांचे पंतप्रधान, ब्रिटनचे मंत्रिमंडळ, दोन राष्ट्राध्यक्ष, 17 देशांचे परराष्ट्रमंत्री हजर राहाणार आहेत.


थॅचर यांच्या अंत्यसंस्कारावेळी ब्रिटनची प्रसिद्ध बीग बेन घड्याळ बंद ठेवण्यात येणार आहे. चर्चील यांच्या मृत्यूनंतर बीग बेन बंद ठेवण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. ब्रिटन आर्म्स फोर्सचे साधारण 700 जवान त्यांना सलामी देणार आहेत. ही सलामी 1982 दरम्यानच्या फोकलँड युद्धातील विजयासाटी दिली जाणार आहे.