आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Britain Warns That ISIS Could Acquire Nuclear And Biological Weapons

ISIS आण्विक, जैविक शस्त्रे मिळवण्याच्या मार्गावर, ब्रिटनचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : ISIS च्या तळांवर बॉम्बहल्ले करण्यासाठी उड्डाण घएणारे ब्रिटीश सैन्याचे विमान.

लंडन - इराक सिरियाच्या काही भागावर कब्जा करून त्याला इस्‍लामिक स्‍टेट असल्याची घोषणा करणारी दहशतवादी संघटना ISIS चा धोका आणखी वाढला आहे. ब्रिटनची गृह मंत्री टेरेसा मे यांनी ISIS लवकरच अण्वस्त्रे आणि जैविकास्त्रे मिळवण्याची शक्यता अशल्याचा इशारा दिला आहे. ब्रिटनवर हल्ला करण्यासाठी त्यांचा वापर केला जाऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच ISIS जगातील पहिल्या दहशतवादी राज्याची स्थापना करू शकते, अशी शक्यताही ब्रिटनने व्यक्त केली आहे.

दरम्यान ब्रिटनने, या दहशतवादी संघटनेच्या अनेक तळांवर वायूहल्ले आणखी वाढवले आहेत. इराकमधील ISIS चे तळ असणारे अनेक परिसर आणि वाहनांना ब्रिटीश सैन्यांने लक्ष्य केले आहे.
अणुबॉम्बचा धोका
दहशतवादासंदर्भात आयोजित टोरी पार्टीच्या एका कॉन्फरन्समध्ये टेरेसा म्हणाले की, जर ISIS ला सिरिया आणि इराकमधील त्यांच्या ताब्यात असलेल्या भागावर पकड मजबूत करण्यामध्ये यश मिळाले तर, ते निश्चितपणे जगातील पहिले आतंकवादी राष्ट्र ठरले. विशेष म्हणजे ते आपल्या देशापासून अत्यंत कमी अंतरावर आहे. ISIS त्यांच्या महिला आणि पुरुष सदस्यांना प्रशिक्षण देऊन ब्रिटनविरोधात युद्ध करण्यात त्यांची मदत घेऊ शकेल असेही टेरेसा म्हणाल्या. तसेच एक राष्ट्र म्हणून आयएसआयएस आण्विक आणि जैविकास्त्रे मिळवून त्यांचा वापर करेल ही शक्यताही नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे या संघटनेवर कारवाई करताना आपण मागेपुढे पाहायला नको. आपण जबाबदारीपासून दूर पळायला नको. आपल्याकडेही संधी आहे आणि त्यांचा अंत करण्यासाठी आपण कारवाई करायलाच हवी, असेही त्या म्हणाल्या.

ब्रिटनने हल्ले वाढवले
संसदेची मंजुरी मिळाल्यानंतर ब्रिटनने ISIS वर हल्ले वाढवले आहेत. ब्रिटनच्या टोरनाडो लढाऊ विमानांच्या मदतीने इराकमधील आयएसआयएसच्या तळांना आणि जवानांच्या ताफ्यांना लक्ष्य केले जात आहे. हे हल्ले सुन्‍नी दहशतवादी संघटनेच्या विरोधात लढणा-या कुर्द जवानांना मदत मिळावी म्हणून केले जात आहेत. ही लढाऊ विमाने सायप्रसहून हत्यारे घेऊन उड्डाणे घेत आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, ब्रिटीश विमानांद्वारे केल्या जाणा-या हल्ल्यांचे PHOTO