आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Britain Will Be Participate In Air Attack On Islamic State, Divya Marathi

इस्लामिक स्टेटच्या विरोधातील हवाई मोहिमेत ब्रिटनचा सहभाग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दमास्कस - इस्लामिक स्टेटच्या विरोधात अमेरिकेच्या नेतृत्वाखालील दीर्घ हवाई मोहिमेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी शुक्रवारी संसदेला पाठिंब्याचे आवाहन केले.
आयएसचा ब्रिटिश नागरिकांना धोका आहे. त्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पैसा असलेली ही संघटना आहे. सिरिया आणि इराकमध्ये त्याचा अनुभव आला आहे. ही मोहीम सुरू केल्यानंतर काही महिनेच नव्हे तर वर्षेही द्यावी लागतील. याचा विचार करूनच त्यात उतरले पाहिजे. त्यासाठी राष्ट्रीय सहमतीची गरज असल्याचे मत त्यांनी संसदेत बोलून दाखवले. आयएसने अलीकडेच इराक सिरियातील मोठा भाग आपल्या ताब्यात घेतला आहे. दहशतवादी संघटनेकडे ३१ हजारांहून अधिक हल्लेखोर आहेत.
काही दिवसांपूर्वी ब्रिटिश कामगार डेव्हिड हेन्सचा शिरच्छेद करण्यात आला होता. हवाई हल्ल्यात सहभागी होण्यासाठी ब्रिटनमधील मुख्य राजकीय पक्ष काँझर्व्हेटिव्हज, लिबरल डेमोक्रॅट्स आणि लेबर पक्षाकडून त्याला पाठिंबा दिला होता.

१७९ सैनिकांचा मृत्यू
२००३ते २००९ या काळात इराकमध्ये झालेल्या युद्धात १७९ ब्रिटिश सैनिकांचा मृत्यू झाला होता. २०११ मध्ये ब्रिटनने ५०० सैनिक तैनात ठेवले होते.