आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यसनमुक्तीसाठी धावणे सुरू; चाळिशीत कॉमनवेल्थमध्ये धडक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टीव्ह वे : ब्रिटिश अ‍ॅथलिट
आतापर्यंत 41 हजार 794 कि.मी. धावला, पृथ्वीला एक प्रदक्षिणा मारण्याइतपत अंतर
दारू-सिगारेटचे व्यसन असणारा 102 किलो वजनाचा तरुण अ‍ॅथलिट होऊ शकतो, याचा कोणी विचारही करू शकणार नाही. मात्र, इंग्लंडच्या स्टीव्ह वेने 40 व्या वर्षात केवळ व्यसनच सोडले नाही तर ग्लासगोच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तो सहभागीही झाला आहे.

शाळेत असताना स्टीव्हला खेळात अजिबात रुची नव्हती. क्रॉस कंट्री दौडमध्ये त्याला बळजबरीने भाग घ्यावा लागला होता. पहिल्या टप्प्यानंतर तो झाडाझुडपात लपत असे. सहकारी शेवटच्या टप्प्यासाठी धावताना त्यांच्यात तो सहभागी होत असे. अभ्यासात हुशार असल्यामुळे बँकेत नोकरी मिळाली. 20 व्या वर्षात दारूचे व्यसन जडले. या वेळी त्याचे वजन 102 किलो झाले होते. यादरम्यान असह्य खोकल्याचा त्रास सुरू झाला. 33 व्या वाढदिवशी आरशात बेढब शरीर पाहिल्यानंतर स्वत:चीच लाज वाटली. याच वेळी त्याने व्यसन सोडण्याचा निश्चय केला. यासाठी त्याने दररोज धावण्यास सुरुवात केली. पहिल्या दिवशी 100 मीटर धावल्यानंतर अंग गळून आले. मात्र, माघार घेतली नाही. सरावाने क्षमता वाढत गेली. वजन अर्ध्यावर आले. कमरेचा घेर 38 इंच झाला. तीन आठवड्यांनंतर स्टीव्हने लंडन मॅरेथॉन 2006 मध्ये भाग घेतला. त्यात तो शंभराव्या क्रमांकावर राहिला.

यानंतर स्टीव्हने अ‍ॅथलिट होण्याचे ठरवले आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू केले. नोकरी करत प्रशिक्षण घेणे जिकिरीचे ठरू लागल्याने त्याने बँकेच्या नोकरीवर पाणी सोडले. कमी वेतनाची अर्धवेळ नोकरी तो करू लागला. स्पर्धा काळात पैशाची बचत व्हावी यासाठी तो व्हॅनमध्येच झोपत असे. मात्र, स्टीव्हने यानंतर जे यश मिळवले त्याची कोणीच अपेक्षा केली नव्हती. तो लंडन मॅरेथॉन-2014 मध्ये तिसर्‍या क्रमांकावर आल्यानंतर कॉमनवेल्थ गेम्ससाठी पात्र झाला.