आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमधील राजेशाहीवर नागरिकांचा सर्वकाळ विश्वास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटिश नागरिकांचा आपल्या राजेशाहीवर संपूर्ण विश्वास आहे. राजेशाहीच्या सर्व कालखंडात राजघराण्यावरील विश्वासाची पातळी तसुभरही कमी झाली नाही. नवीन जन्माला आलेला युवराज एक दिवस राजघराण्याची गादी सांभाळतील, असा विश्वास नागरिकांनी सर्वेक्षणात व्यक्त केला.


युवराज विल्यम व युवराज्ञी केट मिडलटन यांचा मुलगा जॉर्ज एक दिवस राजाच्या सिंहासनावर विराजमान होईल, असे बहुतांश नागरिकांचे म्हणणे आहे. ब्रिटन हा प्रजासत्ताक देश असल्यामुळे युवराज जॉर्ज राजा होणार नाही, असे 9 टक्के नागरिकांचे म्हणणे आहे. 18 ते 24 वयोगटातील तरुणांनी प्रजासत्ताक राज्याबद्दल पसंती दर्शवली. सर्वेक्षणात सहभागी 69 टक्के नागरिकांनी एक दिवस युवराज जॉर्ज राजा होईल, असा विश्वास व्यक्त केला. प्रजासत्ताक राज्यपद्धती उपयोगाची नाही, असे बहुतांश लोकांचे म्हणणे आहे. ब्रिटनमध्ये राजेशाहीच योग्य आहे, असे 66 टक्के नागरिकांचे म्हणणे आहे. 17 टक्के नागरिकांनी प्रजासत्ताक राज्यपद्धतीला पसंती दर्शवली आहे.


सर्वेक्षणात सहभागी तरुणांमध्ये ड्यूक अ‍ॅँड डचेस ऑफ केंब्रिज म्हणजे युवराज विल्यम व युवराज्ञी केट मिडलटन लोकप्रिय असल्याचे दिसून आले आहे. राजघराण्यामध्ये राणीनंतर युवराज हॅरीलाही तेवढीच लोकप्रियता लाभली आहे. राणी एलिझाबेथ यांनी राजघराण्याची सूत्रे स्वीकारल्याच्या घटनेस 60 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गेल्या वर्षी हीरकमहोत्सव साजरा करण्यात आला होता. पाहणीत राजेशाहीवर दाखवण्यात आलेला विश्वास व व्यक्त करण्यात आलेली मते सारखीच आहेत. राजेशाहीशिवाय ब्रिटनची अवस्था वाईट झाली असती, असे 53 टक्के लोकांचे म्हणणे आहे, तर 14 टक्के नागरिकांनी त्या विरोधात मत नोंदवले.


बाविसाव्या शतकात राजेशाही संपुष्टात
ब्रिटनमधील राजेशाही या शतकात संपुष्टात येईल, असा कौल या सर्वेक्षणातून मिळाला. युवराज चार्ल्स, युवराज विल्यमनंतर युवराज जॉर्जची कारकीर्द बाविसाव्या शतकात संपुष्टात येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ब्रिटन आगामी काळात संपूर्ण प्रजासत्ताक देशाचा दर्जा प्राप्त करेल, त्यामुळे गेल्या सोमवारी जन्मलेला युवराज जॉर्ज राजा होणार नाही, असे दहा टक्के नागरिकांचे म्हणणे आहे.