आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • British Couple Scoop Million pound Lottery With Forgotten Ticket

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रीजमध्ये विसरलेल्या लॉटरीने दिले 8 कोटी 70 लाख रुपये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - विसरभोळेपणामुळे जवळपास दोन महिने फ्रीजमध्येच पडून राहिलेल्या लॉटरीच्या तिकिटाने एका ब्रिटिश दांपत्याला तब्बल एक दशलक्ष पौंड (8 कोटी 70 लाख रुपये) मिळवून दिले.अर्थात तेही त्यांच्या पेपरवाल्याच्या कृपेमुळे.

अँलन (46) आणि किम एलियट (45) हे ते भाग्यवान दांपत्य आहे.अँस्पली, नॉटिंगहम येथे राहणार्‍या या दांपत्याने 23 मार्च रोजी याच वृत्तपत्रविक्रेत्याकडून तिकीट घेतले होते. त्यांनी त्याला जुनी पुराणी अनेक तिकिटे पाहावयास दिली असता त्यामध्ये हे तिकीट निघाले.त्यांनी तिकीट वेळेत पाहिले असते आणि ही रक्कम बँकेत ठेवली असती तर आणखी 7500 पौंडाचा फायदा झाला असता.अर्थात एवढय़ा दिवसाचे व्याज बुडाल्याची या दांपत्याला चिंता नाही.कारण तिकीटच हातचे गेले असते तर काय असे या दांपत्याचे म्हणणे आहे.

वृत्तपत्रविक्रेत्याने तिकीट पाहिल्यानंतर 1 दशलक्ष पौंडाची लॉटरी लागल्याचे सांगितल्यावर माझा तर विश्वासच बसला नाही.मला वाटले तो फिरकी घेतोय असे अँलन म्हणाला.अँलन आणि किम आता त्यांची प्युजो 308 कार बदलून रेंज रोव्हर घेणार आहेत आणि मस्त सहलीवर जाणार आहेत.