आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • British Doctor Branded His Initials On Patient's Liver

स्वत:चे ब्रँडिंग करण्यासाठी डॉक्टरने कोरले रुग्णाच्या यकृतावर नाव!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - नावाचे ब्रँडिंग करण्यासाठी बर्मिंगहॅममधील एका सर्जनने रुग्णाच्या यकृतावर स्वत:चे नाव लिहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी सर्जन सायमन बेमहॉल यास तडकाफडकी निलंबित करण्यात आले.
बर्मिंगहॅमच्या राणी एलिझाबेथ रुग्णालयात एका रुग्णाच्या यकृतावर सहकारी डॉक्टर नियमित शस्त्रक्रिया करत असताना त्याला त्या रुग्णाच्या यकृतावर सर्जनच्या नावाची आद्याक्षरे आढळून आली. एनएचएस फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने हे रुग्णालय चालवण्यात येते. सर्जनने रुग्णाच्या यकृतावर आपल्या नावाची आद्याक्षरे लिहिल्याचे लक्षात आल्यानंतर चौकशी सुरू करण्यात आली आहे, असे ट्रस्टने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. याच रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी केलेल्या चुका आणि त्यामुळे रुग्णांना झालेल्या त्रासासंबंधीच्या बातम्या याआधीही प्रसिद्ध झाल्या आहेत.
ब्रँडिंग बेकायदा
ब्रिटनमधील कायद्यानुसार डॉक्टरला
रुग्णाच्या शरीरावर किंवा कोणत्याही अवयवांवर आपल्या नावाचे असे ब्रँडिंग करता येत नाही. हा दंडनीय गुन्हा ठरतो. त्यामुळे चौकशीनंतर या सर्जनवर खटला दाखल केला जाऊ शकतो.
अशा चुका गंभीरच
जगातील सर्वोत्तम डॉक्टर, नर्स आणि एकूणच आरोग्य सेवा देण्याचा दावा ब्रिटनमध्ये केला जात असताना अशा चुका घडणे गंभीर आहे. त्यामुळे रुग्णाची न भरून येणारी हानी होऊ शकते.
-डॉ. माइक डर्किन, रुग्ण सुरक्षा संचालक