आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • British ISIS Hostage Alan Henning Beheaded New Video Released

ISIS ने जारी केला पुन्हा व्हिडिओ, ब्रिटिश नागरिकाचे शिर कलम केल्याचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: एलन हेनिंग याचे शिर कलम करण्यापूर्वी धमकी देताना ISISचा दहशतवादी)

लंडन- दहशतवादी संघटना 'इस्लामिक स्टेट इन इराक अँड सीरिया'ने (ISIS) आणख‍ी एका व्यक्तीचे शीर कलम केल्याचा दावा केला आहे. ISISने शुक्रवारी आणखी एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात एका ब्रिटिश व्यक्तीचे शीर कलम करताना दाखवण्यात आले आहे. एलन हेनिंग असे या ब्रिटिश व्यक्तीचे नाव आहे. ISIS ने जारी केलेल्या व्हिडिओत अमेरिकेतील पीटर कासिंग याचेही शिर कलम केले जाणार असल्याचा इशारा दिला आहे.

एलन हेनिंग हा उत्तर लंडनमधील रहिवासी असून तो टॅक्सी चालवत होता. हेनिंग हा सीरियात राहत सामग्री पोहोचवण्यासाठी जात असताना त्याला ISISच्या दहशवाद्यांनी बंधक बनवले होते.

यापूर्वी ISIS ने ब्रिटनमधील डेव्हिड हेन्स याचे शिर कलम केल्याचा व्हिडिओ जारी केला होता. ISIS ने आतापर्यंत हेनिंगसह एकूण चार व्यक्तीचे शिर कलम करून त्यांची हत्या केली आहे. सगळ्यात आधी अमेरिकन पत्रकार जेम्स फॉली, नंतर स्टीव्हेंस सोटलॉफचे शिर कलम केल्याचा व्हिडिओ जारी केला होता.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, कोण आहे एलन हेनिंग आणि त्याचे कुटूंबिय...