(ब्रिटिश मुस्लिम संघटनेने ट्विटरवर टाकलेला हा फोटो #NotInMyName कॅम्पेनचा भाग आहे.)
लंडन- ब्रिटनच्या युवा मुस्लिमांनी ISIS ला विरोध करण्यासाठी व्यापक अभियान छेडले आहे. या ऑनलाईन अभियाना अंतर्गत ISIS कडून केल्या जाणाऱ्या क्रूर हत्यांचा निषेध केला जात आहे. ब्रिटनच्या अॅक्टिव्ह चेंज फाऊंडेशनच्या माध्यमातून हा संदेश लोकांपर्यंत पोहोचविला जात आहे. ISIS ने ज्या माध्यमाचा वापर दहशत पसरवण्यासाठी केला होता त्याचाच वापर करुन हे युवा मुस्लिम शांतीचा संदेश देत आहेत.
ISIS विरुद्ध अभियान छेडणाऱ्या ब्रिटन युवा मुस्लिमांचे म्हणणे आहे, की खोटे बोलून ISIS इस्लामची प्रतिमा मलिन करीत आहे.
आपल्या चुकांवर पडदा टाकत आहे. या अभियानातील युवक हनिफ कादिर म्हणाला, की ISIS च्या दहशतवाद्यांनी सोशल मीडियावर सुरू केलेला प्रचार आणि विरोधाच्या भूमिकेमुळे ब्रिटनमधील मुस्लिम त्रस्त झाले आहेत. हे लोक इस्लामच्या नावावर द्वेष पसरवत आहेत. चुकीचे मार्गदर्शन करीत आहेत.
ब्रिटनच्या युवा मुस्लिमांनी सुरू केलेल्या कॅम्पेनला बराक ओबामा यांनी पाठिंबा दर्शवला आहे. ओबामा यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत #NotInMyName (नॉट इन माय नेम) चे जोरदार कौतुक केले होते.
पुढील स्लाईडवर बघा, काय म्हणत आहेत या कॅम्पेनमध्ये सहभागी झालेले मुस्लिम युवक...