आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिरियावरील हल्ल्यास ब्रिटिश संसदेचा नकार,231 वर्षांत पहिल्यांदाच सरकार तोंडघशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - सिरियावरील हल्ल्याबाबतचा पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचा प्रस्ताव ब्रिटिश संसदेने फेटाळून लावला. 231 वर्षात सरकारला युद्धाची मंजुरी न मिळण्याची ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी 1782 मध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकारला अमेरिकेबरोबरचे युद्ध सुरू ठेवण्यास परवानगी नाकारण्यात आली होती.


पंतप्रधान कॅमेरून यांच्या प्रस्तावावर गुरुवारी ब्रिटिश संसदेत सलग सात तास चर्चा झाली. त्यानंतर रात्री उशिरा मतदान झाले. प्रस्तावाच्या बाजूने 272, तर विरोधात 282 मते पडली. सत्ताधारी आघाडीच्या 50 खासदारांनी आपल्याच सरकारच्या विरोधात मतदान केले. प्रस्ताव फेटाळल्यानंतर विरोधकांनी पंतप्रधान कॅमेरून यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ती त्यांनी फेटाळून लावली. विरोधी पक्ष सिरियाला पाठिंबा देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तद्वतच संसदेचा निर्णयही मान्य असल्याचे सांगितले.


संसदेच्या निर्णयातून ब्रिटिश जनतेच्या मतांचे प्रतिबिंब दिसते. जनतेला कोणतीही लष्करी कारवाई नको आहे, हे माझ्या लक्षात आले आहे. मी त्यानुसारच काम करीन, असे कॅमेरून म्हणाले. ‘आता ब्रिटन कोणत्याही लष्करी कारवाईत सहभागी होणार नाही,’ असे पंतप्रधानांच्या प्रवक्त्याने नंतर सांगितले.