आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटिश प्रिन्स फिलिप यांच्यावर तातडीने यशस्वी शस्त्रक्रिया

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- महाराणी एलिझाबेथ यांचे पती ड्यूक ऑफ एडिनबर्ग फिलिप यांच्यावर शनिवारी तातडीने यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या पोटावर ही शस्त्रक्रिया झाली. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले.

फिलिप यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याबद्दल डॉक्टरांनी समाधान व्यक्त केले आहे. सोमवारी फिलिप यांनी 92 व्या वर्षांत पदार्पण केले. त्यांना किमान दोन आठवडे रुग्णालयात राहावे लागेल, असे सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी रात्री फिलिप यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी राजवाड्याच्या उद्यानात पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीनंतर त्यांना पोटाची तक्रार जाणवली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.