आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटिश युवराज हॅरीला जिवे मारण्याची धमकी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटिश युवराज हॅरीला जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी देणा-या एका व्यक्तीने रविवारी पोलिस ठाण्यात याची कबुली दिली आहे.


हॅरी यांना मारण्याची धमकी देणा-या आरोपीला स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांनी शनिवारी अटक केली. अशरफ इस्लाम (30) असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याला 25 मे रोजी न्यायालयात हजर केले असता त्याची कोठडीत रवानगी झाली आहे. त्यास अद्याप शिक्षा ठोठावण्यात आलेली नाही. अशरफ 24 मे रोजी स्वत: हून पोलिसांना शरण आला. लंडनमध्ये जवानाची हत्या झाल्याच्या दुस-या दिवशी अशरफने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या धमकीचे कारण शोधण्याचा प्रयत्न स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्याच्यावर दहशतवाद्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे स्कॉटलंड यार्डच्या प्रवक्त्याने सांगितले.


अशरफ पूर्वाश्रमीचा मार्क टॉनली आहे. आपला इस्लामवर विश्वास आहे, असे त्याने सांगितले. न्यायालयात तो दोषी ठरला तर त्यास 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अशरफ याच्याजवळून लॅपटॉप, बंदूक आणि व्हॅनदेखील जप्त केली आहे. अपहरण करण्यासाठी आवश्यक असणारी माहिती इंटरनेटवरून सर्चिंग केल्याचेही त्याच्या इंटरनेट हिस्ट्रीचा आढावा घेतल्यानंतर पोलिसांना लक्षात आले आहे.


तालिबानचे लक्ष्य ?
तालिबानी दहशतवादी संघटना 28 वर्षीय हॅरी यांना लक्ष्य करू शकते, अशी भीती व्यक्त झाल्यानंतर हॅरीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे संडे मिररच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. 2008 मध्ये हॅरीने अफगाणिस्तानमधील लढाईत सहभाग घेतला होता. त्या शिवाय या भागाला दोन वेळा भेटी दिल्या होत्या. त्यामुळे तालिबान त्यांना लक्ष्य करू शकते, असे राजवाड्याच्या सूत्रांनी सांगितले.