आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • British Scientists Develop Camera Which Takes 3D Picture From One Kilometer Distance

एक किलोमीटर अंतरावरून काढा थ्री डी छायाचित्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटिश शास्त्रज्ञांनी एक असा कॅमेरा तयार केला आहे, ज्याच्या वापराने तुम्ही एक किलोमीटर अंतरावरच्या वस्तूचे छायाचित्र टिपू शकता. लेझर पॉवर तंत्रज्ञानाचा वापर केलेला असल्याने हा कॅमेरा एच डी म्हणजे हाय रिझोल्यूशनची छायाचित्रे सहज टिपू शकतो. विशेष म्हणजे या कॅमेर्‍याच्या साहाय्याने तुम्ही थेट थ्री डी छायाचित्रे घेऊ शकतात. कोणत्याही वस्तूचे थ्री डी छायाचित्र काढण्यासाठी त्या वस्तूची त्रिमितीय आकाराशी संबंधित सर्व माहिती असणे आवश्यक असते. ही माहिती प्राप्त करण्यासाठी एका विशेष प्रकारच्या लेझर बीमचा वापर करण्यात आल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली.

असे काढतो फोटो
लेझर किरणे कोणतेही माध्यम पार करू शकतात. कोणत्याही वस्तूच्या अंतर्गत घटकांपर्यंत लेझर किरणे पोहोचतात आणि त्या आधारावर हा कॅमेरा क्षणार्धात समोरच्या वस्तूचे थ्री डी छायाचित्र काढतो. हा कॅमेरा तयार करणार्‍या टीमच्या प्रमुखाने दिलेल्या माहितीनुसार दूरवर असलेल्या वस्तू, प्राणी, गाडी, व्यक्ती यांचे छायाचित्र व त्याआधारे त्यांचे संपूूर्ण मोजमाप घेता येते. एवढेच नव्हे तर या सॉफ्टवेअरच्या इमेज प्रोसेसिंग सॉफ्टवेअरमध्ये थोडा बदल करून त्या व्यक्ती, प्राणी किंवा वाहनाची चाल आणि त्यांच्या दिशेबाबतही माहिती घेता येते. ‘टाइम आॅफ फ्लाइट नेव्हिगेशन’ नावाचे हे सॉफ्टवेअर सगळ्याच अ‍ॅप्लिकेशनमध्ये वापरले जाते.

परावर्तनाची अडचण नाही : सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या इतर कॅमेर्‍यांची थ्री डी रेंज खूप कमी आहे. ज्या वस्तूंवरून लेझर कि रणे परावर्तित होत नाहीत, त्या वस्तूंचे थ्री डी छायाचित्र काढणे या कॅमेर्‍यांना शक्य नाही. मात्र नव्याने तयार करण्यात आलेल्या या कॅमेर्‍यात अशा प्रकारची कोणतीही अडचण येणार नाही. प्रखर ऊन आणि दाट काळोखात लेझर किरणांच्या परावर्तनास अडचण निर्माण होते, मात्र या कॅमेर्‍याच्या साहाय्याने अशा परिस्थितीतही अपेक्षित वस्तूचे थ्री डी छायाचित्र काढता येणार आहे.