आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • British Tornado Gr4 Fighter Plans Bombing On ISIS

PICS : ब्रिटिश टॉरनॅडोद्वारे सुरू आहेत ISIS वर हल्ले, वेग ताशी 1,490 मैल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : ब्रिटिश लढाऊ विमान टॉरनॅडो GR4

संसदेची मंजुरी मिळताच ब्रिटनने ISIS वर हल्ले सुरू केलेल आहेत. ब्रिटिश टॉरनॅडो GR4 या लाढाऊ विमानांच्या मदतीने इस्लामिक स्टेटला लक्ष्य करण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर याठिकाणी टॉरनॅडो लढाऊ विमानांबाबत माहिती देण्यात येत आहे.
टॉरनॅडो GR4 ची वैशिष्ट्ये
ब्रिटिश लढाऊ विमानात दोन पायलट एकावेळी बसू शकतात. विमानाची एकूण लांबी 54 फूट 10 इंच आहे. तर पंखांची लांबी 45.6 फूट आहे. हे विमान मॅक 2.2 च्या वेगाने हवेत उडते. म्हणजे याचा वेग सुमारे ताशी 1,490 मैल एवढा आहे. टॉरनॅडो 50,000 फूट उंचीपर्यंत उड्डाण घेऊ शकते. त्यात दोन शक्तिशाली टर्बो यूनियन RB199-34R Mk103 इंजीन आहेत. विमानाची किंमत 56 मिलियन पाऊंड म्हणजे पाच अब्ज 61 कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे.

साइप्रस हत्यारांचा समावेश
ही विमाने सायप्रस हत्यारांसह उड्डाण घेत आहेत. अक्रोतिरी एअरबेसवर सहा टॉरनॅडो GR4 लढाऊ विमाने उभी आहेत. त्यात स्टॉर्म शॅडो मिसाइल आहेत. ही मिसाइल ब्रिटन, फ्रान्स आणि इटलीसारख्या देशांमध्ये वापरली जाते. तिला 'बंकर बस्टर' ही म्हटले जाते. पूर्ण कंपाऊंट नष्ट करण्याची क्षमता या मिसाइलमध्ये आहे. सुमारे 1.3 टन त्याचे वजन असून ताशी 530 मैल वेगाने ऑटोमॅटिक टार्गेट रेकग्नेशन (एटीआर) च्या मदतीने लक्ष्य करते.
पेव-वे IV
टॉरनॅडो GR4 मध्ये पेव-वे IV बॉम्बही आहे. लेजर आणि जीपीएसच्या मदतीने अचून नेम लावण्याची क्षमता त्यात असते. 227 किलोचा हा बॉम्ब एखादे छोटे मैदान नष्ट करू शकतो. अफगानिस्तानमध्ये रॉयल एअर फोर्स (आरएएफ) द्वारे त्याचा व्यापक पद्धतीने वापर केला जातो.
ब्रिमस्टोन मिसाइल
टॉरनॅडो GR4 मध्ये ब्रिमस्टोन मिसाइलही आहे. तिच्या मदतीने सुमारे सात मैलाच्या अंतरावरून शत्रूला लक्ष्य करता येऊ शकते. ही मिसाइल 50 किलो वजनाची आहे. मिसाइलमध्ये हाय डेफिनेशन रडार आणि लेजर लोकेटरही लावलेले आहेत.

पुढे पाहा, टॉरनॅडोद्वारे करण्यात आलेल्या हल्ल्याचे PHOTO