आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेक्सपियरने ‘हॅम्लेट’ लिहिले हे ब्रिटिशांनाच माहीत नाही

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - जगप्रसिद्ध ब्रिटिश नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्या ‘हॅम्लेट’ या नाटकाची अजूनही जगभर पारायणे केली जात असली तरी हे नाटक शेक्सपियरने लिहिले हे पाचपैकी फक्त एकाच ब्रिटिशाला माहीत आहे. ‘द ग्रेट एक्स्पेक्टेशन्स’चे लेखक चार्ल्स डिकन्स आहेत, हे अनेकांना माहीतच नसल्याचे सर्वेक्षणात समोर आले.
वाचनाची आवड केवळ भारतातच नाही तर जगभरातच कमी होत असल्याचेही या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. नऊपैकी एका ब्रिटिश नागरिकाने गेल्या कित्येक वर्षात एकही पुस्तक वाचले नाही.

दहापैकी एक पुरुष आणि तीसपैकी एक महिला शौचालयात असताना पुस्तक वाचते, असेही या सर्वेक्षणात आढळले आहे.लोक त्या पुस्तकावरील चित्रपट पाहणेच अधिक पसंत करतात. बहुतांश लोकांसाठी पुस्तके वाचणे आता
‘चैन-विलास’ ठरत आहे. त्यांना वाचनासाठी वेळच मिळेनासा झाला आहे, असे ओपिनियम रिसर्चचे व्यवस्थापकीय संचालक जेम्स एंडर्सबे यांनी म्हटले आहे.