तेहरान - इराणमध्ये एका ब्रिटीश महिलेला दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. महिलेचा गुन्हा एवढाच की, तिने पुरुषांची हॉलिबॉल मॅच पाहिली.
25 वर्षीय घोनचेह घवामी सध्या तेहरानच्या तुरुंगात आहे. त्या इराण आणि इटली दरम्यान झालेल्या पुरुषांची हॉलीबॉल मॅच पाहाण्यासाठी मैदानात दाखल झाल्या होत्या. घवामीच्या कुटुंबियांनी सांगितले, की त्या तुरुंगात 41 दिवस एकांतवासात होत्या.
घवामी या स्त्रिवादी कार्यकर्त्या आहेत. इराणमध्ये महिलांवर अनेक बंधने लादण्यात आलेली आहेत. त्याला विरोध करण्यासाठी काही महिलांना घेऊन त्या आझादी स्टेडियममध्ये हॉलिबॉल मॅच पाहाण्यासाठी गेल्या होता. 1979 नंतर झालेल्या इस्लामिक क्रांतीला त्यांचा विरोध आहे. यानुसार इराणमधील महिलांवर अनेक प्रतिबंध लावण्यात आलेले आहेत.
लंडनमध्ये कायद्याचे शिक्षण घेणार्या घवामी यांना सुरवातीला अटक करुन सोडून देण्यात आले होते. त्यानंतर त्या त्यांचे सामान घेण्यासाठी परत आल्या तर त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. त्यांच्यासोबत इस्लामिक क्रांतीला विरोध करणार्या इतरांनाही अटक करण्यात आली होती.
सुटकेसाठी आंदोलन
घवामी यांच्या सुटकेसाठी सोशल मीडियासोबतच जगभरातील स्त्रीवाद्यांनी इराणवर दबाव आणला होता.
फेसबुकवर स्वतंत्र पेज तयार करण्यात आले आणि
ट्विटरवर त्यांच्या सुटकेसाठी पोस्ट टाकण्यात आल्या होत्या. त्यासोबत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेनेही त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. या सर्वांच्या दबावानंतर
इराकने त्यांची सुटका केली.
इराण पोलिसांचे स्पष्टीकरण
इराण पोलिसांचे प्रमुख इस्माइल अहमदी म्हणाले, सध्याच्या परिस्थिती महिला आणि पुरुषांनी एकत्र स्टेडियममध्ये जाणे जनतेच्या हिताचे नाही. नियम आणि कायद्यांबद्दल धार्मिक गुरु आणि नेत्यांचा दृष्टीकोण अजूनही बदलेला नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत महिलांना स्टेडियममध्ये सोडण्याची परवानगी नाही.
पुढील स्लाइडमध्ये, ब्रिटीश कार्यकर्त्या घोनचेह घवामी यांची छायाचित्रे आणि त्यांच्या सुटकेसाठी चालवण्यात आलेल्या आंदोलनाची छायाचित्रे.
(छायाचित्र - घोनचेह घवामी यांचे हे छायाचित्र त्यांच्या सुटकेसाठी चालवण्यात आलेल्या फेसबुक कँपनमधून घेण्यात आले आहे. )