आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या बिछान्यावर झोपल्या 15 पिढ्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनमधील बर्कले कुटुंबात 400 वर्षांपूर्वीचा बिछाना आजही वापरात आहे. या बिछान्यावर आतापर्यंत 15 पिढय़ा झोपल्या आहेत. ग्लुस्टरशायर येथील बर्कले कॅसल इस्टेटमध्ये राहणारे बर्कले कुटुंब 1608 पासून या नक्षीदार बिछान्याचा वापर करत आहे. एवढय़ा वर्षांत इतर कित्येक फर्निचर तुटतात किंवा खराब होतात. पण या बिछान्यावर 81 वर्षांचे जॉन बर्कले आणि त्यांची 73 वर्षीय पत्नी जॉजिर्ना आजही आरामात झोपतात. फर्निचर जाणकारांच्या अंदाजानुसार तो 1560-1640 दरम्यान तयार करण्यात आला असावा. त्यांच्या मते, बिछान्याच्या चार पायांवर बसवलेला शाही हेडबोर्ड स्टुअर्ट राजेशाही आहे. त्यावरून हा पलंग इसवीसन 1603 च्या सुमारातील असण्याचा अंदाज आहे. पलंगांच्या पायावर चितारलेले पुरुष आणि महिलेचे चित्र बर्कले कुटुंबातील सातवे वंशज हेनरी बर्कले आणि त्याची दुसरी पत्नी जेन हिचे प्रतिनिधित्व करणारे असावे, असे मानले जाते. जॉजिर्ना यांच्या मते, हा पलंग जुना असला तरी वाड्यातील इतर पलंगांच्या तुलनेत जास्त आरामदायक आहे. अशा ऐतिहासिक पलंगावर झोपण्याचा अनुभव खूप वेगळा आहे.

ब्रिटनच्या इतिहासात बर्कले कुटुंबाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. या कुटुंबाचे मूळ पुरुष रॉबर्ट फिथार्डिंग हे होते. त्यांचा मृत्यू 1170 मध्ये झाला. ते कंफेसरमध्ये किंग एडवर्ड यांच्या हाताखाली काम करणार्‍या उच्च अधिकार्‍यांचे नातू होते. पलंगाची माहिती 20 सप्टेंबर 1608 च्या यादीत नोंदवलेली आहे. तेव्हा तो पार्क लॉजमध्ये प्रथम आणला गेला. हे लॉज म्हणजे बर्कले कॅसल इस्टेटचाच एक भाग आहे. प्रथम दर्जाची ही इमारत इंग्लंडमधील सर्वात जुनी इमारत आहे. तसेच ज्या बर्कले कुटुंबानी इमारत बांधली, तेच कुटुंब आजही तेथे राहते.