आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बांगलादेशात डोरेमॉनच्या प्रसारणावर बंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


ढाका - बांगलादेश सरकारने कार्टून शो ‘डोरेमॉन’च्या प्रसारणावर बंदी घातली आहे. देशात टीव्ही चॅनल्सवर जपानी कार्यक्रमांचे हिंदीत प्रसारण केले जाते. या मालिकेमुळे मुलांवर नकारात्मक परिणाम होत होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे.बांगलादेश माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अधिका-याने सांगितले की, केबल ऑपरेटर्सना सरकारने आदेश देऊन डोरेमॉन मालिकेचे प्रसारण न करण्यास सांगितले आहे.

मालिकेतील डोरेमॉन नावाचे पात्र कायम खोटे बोलते तसेच कायम शाळेतून पळून जाण्याच्या प्रयत्नात असते. त्याचा परिणाम मुलांवर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यावर बंदी घालण्यात आली. ही मालिका हिंदीत असल्याने त्यावर बंदी घालण्यात आल्याच्या वृत्ताचा प्रवक्त्याने इन्कार केला. काही दिवसांपूर्वी बांगलादेशी प्रसारमाध्यमांनी डोरेमॉन हिंदी बोलत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती.