आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकमध्ये पावसात भिजल्याने भावाने केली दोन बहिणींची हत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पावसात भिजायला, त्याची छायाचित्रे काढायला किंवा त्याचे छायाचित्रण करायला कुणाला आवडत नाही. परंतु, पाकिस्तानमधील दोन बहिणींना पावसात भिजत त्याचे छायाचित्रण करणे चांगलेच महाग पडले आहे. पावसात भिजतानाचे छायाचित्रण सर्वत्र पसरल्याने त्यांच्या सावत्र भावानेच मित्रांच्या मदतीने दोन बहिणींची आणि आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

गिलगीट प्रांतातील उत्तरेकडील चिलास शहरात ही घटना घडली आहे. नूर बसरा आणि नूर शेरा अशी या बहिणींची नावे आहेत. मोबाईल फोनच्या मदतीने त्यांनी पावसात भिजतानाचे छायाचित्रण केले होते. त्यानंतर मोबाईल नादुरुस्त झाल्याने त्यांनी तो एका मोबाईल दुकानात दिला होता. परंतु, यावेळी त्यांनी शुट केलेले छायाचित्रण शहरात लिक झाले. त्यामुळे चिडलेल्या खुटोरे नावाच्या सावत्र भावाने कुटुंबाच्या तथाकथीत प्रतिष्ठेसाठी दोन बहिणींची आणि आईची हत्या केली. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे.

गेल्या वर्षी एका लग्नसमारंभात नृत्य करणारया चार महिलांची हत्या करण्यात आली होती. अशा स्वरूपाच्या घटना पाकिस्तानमध्ये हमखास घडत असतात.