आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन अंश सेल्सियस तापमानात सबंध ब्रिटन चिमुरड्याच्या शोधात..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एडनबर्ग (स्कॉटलंड) - गुरुवारी संपूर्ण ब्रिटनमध्ये एकच चर्चा होती. भारतीय वंशाचा तीन वर्षांचा मुलगा बेपत्ता होता. कोस्ट गार्ड, हेलिकॉप्टर, पोलिस, श्वानपथक सगळ्यांनी संपूर्ण ब्रिटनमध्ये शोध घेतला. जवळपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, पण एकही पुरावा सापडला नाही. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर झुडपांमध्ये त्याचा मृतदेह आढळला. त्या वेळी तापमान होते दोन अंश सेल्सियस. मृत्यूचे कारण कळले नाही, पण संपूर्ण ब्रिटन सुन्न झाले.
स्कॉटलंडची राजधानी एडनबर्गजवळ फिफ नावाच्या एका गावात या मुलाची आई रोजदीप चार मुलांसह राहते. बुधवारी रोजदीप घरातच होती, पण तीन वर्षांचा मिखाइल कुलर घरातून कसा गायब झाला हे तिला कळलेच नाही. संध्याकाळपर्यंत टीव्हीवर त्याच्या फोटोसह बेपत्ता झाल्याची बातमी झळकली. दुस-या दिवशी संपूर्ण ब्रिटनची देशभरातील यंत्रणा शोधमोहिमेवर रुजू झाली. स्कॉटलंड पोलिस विभागातील लीज मॅकेंज यांच्या मते, कदाचित मिखाइल स्वत:च सुरक्षा व्यवस्थेला चकवा देऊन बाहेर पडला असावा. रस्ता चुकल्यामुळे तो घरी परतू शकला नाही. ‘होम अलोन’ चित्रपटातून त्याला हे सुचले असावे. या प्रयत्नात त्याचा दु:खद मृत्यू झाला.