आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रुस लीच्या ‘वन इंच पंच’ चा महिमा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध मार्शल आर्टिस्ट व अभिनेते ब्रुस ली कोणालाही त्यांच्या वन इंच पंचने गारद करू शकतात. ‘वन इंच पंच’ चिनी मार्शल आर्टमध्ये एक महत्त्वाची पंचिंग कसरत आहे. ब्रुस लीमुळे त्याला अधिकच प्रसिद्धी मिळाली. यात लक्ष्याचा 0 ते 15 सेंटिमीटरच्या अंतरावरून वेध घेतला जातो.
पॉप्युलर मेकॅनिक्सचे विल्यम हर्केविट््ज यांनी लीच्या प्रहार ताकदीवर संशोधन केले. आपल्या प्रत्येक मांसपेशीतून शक्ती निर्माण करण्याचे कौशल्य ब्रुस लीला अवगत आहे. स्टॅनफोर्डच्या बायोमेकॅनिकल संशोधक जेसिका रोज म्हणतात, ब्रुस लीचा हात लक्ष्याचा दिशेने जातो, तेव्हा त्यांच्या प्रत्येक मांसपेशीतून सर्व शक्ती एकत्रितरीत्या त्या दिशेने कृ तिप्रवण होते. अनेक स्नायूंच्या ऊर्जेतून हा पंच प्रभावी ठरतो. वन इंच पंचसाठी समन्वय व वेळेचे नियोजनही महत्त्वाचे आहे. खांदे, मनगट, गुडघे, कोपरा या अवयवांच्या हालचालीत एक समन्वय आवश्यक असतो. तेव्हाच शरीर कृतिशील होते.