Home »International »Other Country» Budha Statue Banned In Iran

बुद्ध मूर्तींच्या विक्रीवर इराणमध्ये बंदी

वृत्तसंस्‍था | Feb 20, 2013, 08:58 AM IST

  • बुद्ध मूर्तींच्या विक्रीवर इराणमध्ये बंदी


तेहरान - इराणने बार्बी बाहुली आणि सिंप्सन या कार्टून पात्रानंतर आता भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तींवरही
बंदी घातली आहे. बाजारातून बुद्ध मूर्ती जप्त करण्यात आल्या आहेत.

इराणमधील लोक संपन्नतेसाठी लाफिंग बुद्धासह भगवान बुद्धाच्या मूर्ती घरात ठेवतात. या मूर्त्यांची विक्रीही प्रचंड प्रमाणात होते. या मूर्त्यांच्या माध्यमातून अन्य धर्माच्या प्रचाराला प्रोत्साहन दिले जाऊ शकत नाही. इराणच्या दृष्टिने हे देशावरील सांस्कृतिक आक्रमण आहे. इराण हे एक इस्लामी राष्ट्र आहे. मात्र येथील अनेक घरांच्या प्रवेशद्वारावरच बुद्धाच्या मूर्ती लावलेल्या आढळतात. या बहुतांश मूर्ती ‘मेड इन चायना’आहेत. फारसच्या खाडीतून त्या इराणमध्ये विक्रीसाठी आणल्या जातात, असे इराणच्या सांस्कृतिक वारसा विभागाचे अधिकारी सईद जाबेरी अन्सारी यांनी म्हटले आहे. इराणमधील बहुतांश लोक सजावटीच्या वस्तू म्हणून बुद्ध
मूर्ती खरेदी करतात. या मूर्ती घरात ठेवल्याने समृद्धी येते, असा काही लोकांचा समज आहे, असे एका बुद्ध मूर्ती विक्रेत्याने सांगितले.

Next Article

Recommended